Madhya Pradesh News : लग्ना म्हंटल की प्रत्येकाच्या वेगवेगळ्या इच्छा असतात. लग्नचे सर्व क्षण संस्मरणीय बनवण्यासाठी लोक अनेक प्रयत्न करतात. लग्नाच्या पहिल्या रात्रीसाठी लोक भरपूर प्लॅन तयार करतात. मात्र, काही लोक असेही असतात, ज्यांच्या लग्नाबरोबरच त्यांच्या स्वप्नांवरही एक क्षणात पाणी फेरलं जातं. असंच काहीसा प्रकार मध्य प्रदेशातील शिवपुरीमधून घडला आहे. लग्नाच्या पहिल्या रात्री नवरा आनंदाने आपल्या नववधूकडे गेला मात्र त्याला मोठा धक्का बसला. (Latest Marathi News)
त्याला नववधूच्या पोटावर 7 ते 8 टाके पडल्याच्या खुणा दिसल्या. दोघांच्या अंगावरचा हळदीचा रंग अजून उतरला नव्हता, पण नववधूच्या पोटावरचे टाके हे पाहून नवरदेवाच्या चेहऱ्यावरच रंगच उतरला. त्याने नववधूला याबद्दल विचारले असता तिने उडवाउडवीची उत्तर दिली, त्यामुळे संशय अधिकच वाढला. पतीने चौकशी केली असता त्या एका क्षणात त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.
असा उघड झाले गुपित
पत्नीच्या पोटावरील टाक्यांचं रहस्य जेव्हा पतीसमोर उघड झालं, तेव्हा त्याला मोठा धक्का बसला. पतीने सांगितलं की, लग्नाच्या तीन महिन्यांपूर्वी पत्नीचा गर्भपात झाला होता. ही गोष्ट मुलीच्या कुटुंबीयांनी लपवून ठेवले होते. जर लग्नापूर्वी मुलगी गरोदर असल्याचं समजलं असतं तर त्याने हे लग्न (Marriage) कधीच केलं नसतं असे पतीने सांगितले. पत्नीचे रहस्य उघड झाल्यानंतर पतीने नवविवाहित महिलेला तिच्या घरी पाठवलं. या घटनेनं केवळ व्यक्तीच नाही तर घरातील लोकांनाही मोठा धक्का बसला.
रुग्णालयातून सर्व माहिती गोळा केली
पतीने माहितीच्या अधिकाराचा वापर करून पत्नीची सर्व माहिती रुग्णालयातून (Hospital) गोळा केली. लग्नाच्या ३ महिने आधी महिलेचा खासगी रुग्णालयात गर्भपात झाल्याचे कळले. यातून आणखी एक गोष्ट स्पष्ट झाली की, नववधूचे एका दुसऱ्यापुरुषाशी संबंध होते आणि ती त्याच्या पासून गरोदर राहिली. दरम्यान, लग्न निश्चित झाल्यावर तिचा गर्भपात करावा लागला.
पतीविरुद्ध गुन्हा दाखल
दरम्यान, पत्नीला माहेरी परत पाठवण्यात आलं तेव्हा तिने पतीविरुद्ध भरणपोषणासाठी गुन्हा दाखल केला. त्यामुळे या व्यक्तीच्या अडचणीत आणखी वाढ झाली. सध्या हे प्रकरण कायद्याच्या कचाट्यात अडकलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.