Audit reveals corruption in Sheopur district MP saam tv
देश विदेश

Tehsildar arrested MP: केबीसीत ५० लाख जिंकणाऱ्या महिला तहसीलदाराला अटक; अडीच कोटींचा घपला, कारनामे ऐकून थक्क व्हाल!

Audit reveals corruption in Sheopur district MP: मध्यप्रदेशातील श्योपुर जिल्ह्यात पूर मदत निधीतील 2.57 कोटी रुपयांचा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. या प्रकरणात तत्कालीन तहसीलदार अमिता सिंह तोमर यांना अटक करण्यात आली आहे.

Surabhi Jayashree Jagdish

मध्यप्रदेशातील श्योपुर जिल्हातील पूर रस्तांसाठी दिल्या जाणाऱ्या मदत निधीवर डल्ला मारल्याचा मोठा घोटाळा अखेर उघडकीस आला आहे. यामध्ये मुख्य आरोपी असलेल्या तत्कालीन तहसीलदार अमिता सिंह तोमर यांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.

ही संपूर्ण घटना श्योपुर जिल्ह्यतील बडौदा तहसीलशी संबंधित आहे. वर्ष 2021 मध्ये आलेल्या पुरानंतर सरकारकडून पीडितांना आर्थिक मदत देण्यात आली होती. मात्र याच मदतीच्या नावाखाली मोठा गैरप्रकार घडल्याचं आता समोर आलं आह. त्या वेळी तहसीलदार पदावर कार्यरत असलेल्या अमिता सिंह तोमर यांनी सुमारे 25 पटवारी आणि 100 हून अधिक दलालांच्या मदतीने तब्बल 127 बनावट खात्यांमध्ये जवळपास 2.57 कोटी रुपये वळवले, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

कशी उघडकीस आली घटना?

हा प्रकार डेप्युटी कलेक्टर यांच्या ऑडिटदरम्यान उघड झाला. त्यानंतर बडौदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान असंही समोर आलंय की, अनेक नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांना पूरग्रस्त दाखवून त्यांच्या खात्यांमध्ये ही रक्कम जमा करण्यात आली होती.

तोमर यांची न्यायालयात धाव

अटकेपासून बचाव करण्यासाठी तोमर यांनी आधी ग्वालियर खंडपीठात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र त्यांच्या जामिनाचा अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली. मात्र पण 17 मार्च रोजी तिथूनही त्यांची याचिका नामंजूर झाली.

या प्रकरणात आयपीसी कलम 420, 467, 468, 409 आणि 120-बी यांच्यासह भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तपासात ठोस पुरावे मिळाल्यानंतर पोलिसांनी गुरुवारी ग्वालियरमधील त्यांच्या राहत्या घरातून त्यांना अटक केली. त्यानंतर त्यांना श्योपुर न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यानंतर न्यायालयाने त्यांची रवानगी तुरूंगात केली.

विशेष म्हणजे, अटकेच्या एक दिवस आधीच त्यांना विजयपूर तहसीलदार पदावरून हटवण्यात आलं होतं. त्यानंतर लगेचच ही कारवाई करण्यात आली.

केबीसीमध्ये जिंकले होते ५० लाख

अमिता सिंह तोमर यांचं नाव याआधीही चर्चेत आलं होतं. 2011 मध्ये त्यांनी ‘कौन बनेगा करोड़पती’च्या पाचव्या सिझनमध्ये भाग घेतला होता. त्यावेळी त्यांनी 50 लाख रुपयांची रक्कम जिंकली होती. त्यानंतर सोशल मीडियावर केलेल्या वादग्रस्त पोस्टमुळेही त्या चर्चेत राहिल्या होत्या.

याशिवाय वारंवार होणाऱ्या बदलींविरोधात त्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिलं होतं. 2023 मध्ये तहसीलचा कार्यभार न मिळाल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त करत राजीनामा दिला होता. आता मात्र या मोठ्या घोटाळ्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यात विषारी दारुचे 14 बळी, पुणे पोलीस करतायत तरी काय, संतप्त नागरिकांनी दारूचा अड्डा केला उद्ध्वस्त!

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये! राज्यभर आयुर्वेदीक केंद्रांवर FDA ची कारवाई; नामांकित कंपनीचा औषधसाठा जप्त

Maharashtra News Live Update: पुणे विषारी दारू प्रकरण, दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू

भाजपचा दणदणीत पराभव! 'आप'चा 900 जागांवर विजय, काँग्रेसची अवस्था काय?

Avoiding Chips and Cold Drink: चिप्स खाणं आणि कोल्ड ड्रिंक्स पीणं २१ दिवस बंद केल्यावर शरिरावर काय परिणाम होतो?

SCROLL FOR NEXT