भोपाळ : एका खासदारा MP विरोधात तक्रार दाखल होणे ही गोष्ट काही नवीन नाही. बिजू जनता दलाचे Janata Dal खासदाराविरोधात देखील आता तक्रार दाखल करण्यात आली आहे. ओडिशाचे Odisha कटक लोकसभा Lok Sabha खासदार भर्तृहरि महताब, Bhartruhari Mahtab त्यांची पत्नी आणि मुलाच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. हुंड्याकरिता सुनेचा छळ केल्याप्रकरणी मध्य प्रदेश Madhya Pradesh पोलिसांनी Police महताब यांच्याविरोधात कारवाई केली आहे.
हे देखील पहा-
स्थानिक पोलीस अधिकारी अजिता नायर यांनी दिलेल्या माहितीनुसार, महताब यांची ३४ वर्षीय सून साक्षी यांनी बुधवारी भोपाळच्या महिला पोलीस स्टेशनमध्ये पती, सासरे आणि सासू यांच्या विरोधात हुंडासाठी छळवणूक केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, लग्नात माझ्या कुटुंबियांनी खूप मोठ्या प्रमाणात खर्च केला होता.
आता माझ्यावर हुंड्यासाठी सासरचे लोक छळ करत असल्याचे साक्षी यांनी तक्रारीमध्ये सांगितले आहे. तसेच साक्षी यांनी आरोप केला आहे की, तिच्या कुटुंबाने २०१६ मध्ये तिच्या सासऱ्यांना हुंडा म्हणून, १.५ कोटी दिले होते, पण ते आता अधिक पैशांची मागणी करत आहेत. पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार, खासदार, त्यांची पत्नी महाश्वेता आणि मुलगा लोकरंजन यांच्या विरोधामध्ये, IPC कलम ४९८(विवाहित स्त्रीला गुन्हेगारी हेतूने फसवणे किंवा ताब्यात घेणे), ५०६ (गुन्हेगारी धमकावणे) आणि ३४ (गुन्हेगारी कट) आणि हुंडा प्रतिबंधक कायदा, कलम ३/४ अंतर्गत (हुंडा घेणे आणि देणे किंवा हुंडा घेणे आणि देणे) असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोपाळच्या महादेव परिसरात राहणारी तक्रारादर सून साक्षी यांचे लग्न ओडिशाच्या बीजू जनता दलाच्या खासदाराचा मुलगा लोकरंजन यांच्याबरोबर २०१६ ला दिल्ली मध्ये झाले होते.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.