uttar pradesh Shocking  Saam tv
देश विदेश

Shocking : १५ दिवसांच्या मुलाला फ्रिजरमध्ये ठेवून आई झोपी गेली; महिलेच्या कृत्याने खळबळ

uttar pradesh Shocking : ५ दिवसांच्या मुलाला फ्रिजरमध्ये ठेवून आई झोपी गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या महिलेच्या कृत्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

Saam Tv

मुरादाबादमध्ये महिलेने तिच्या १५ दिवसांच्या बाळाला फ्रिजरमध्ये ठेवलं

महिला पोस्टपार्टम सायकोसिस या मानसिक आजाराने ग्रस्त

बाळ मोठ्याने रडल्याने नातेवाईकांकडून वेळीच हस्तक्षेप

घटनेमुळे मानसिक आरोग्याविषयी जनजागृतीची गरज

उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेने तिच्या १५ दिवसांच्या नवजात बाळाला फ्रिजरमध्ये ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बाळ फ्रिजरमध्ये रडू लागल्याने नातेवाईकांना ही बाब समजली. मुरादाबाच्या करुलामध्ये ही घटना घडली आहे. महिलेला मानसिक आजार असल्याने बाळासोबत धक्कादायक कृत्य केल्याचं समोर आलं आहे.

महिला करुला येथील राहणारी आहे. महिलेने १५ दिवसांपूर्वी एका मुलाला जन्म दिला. महिला पोस्टपार्टम सायकोसिस नावाच्या आजाराने ग्रस्त आहे. महिलेने बाळाला जन्म दिल्यानंतर मानसिक आजाराने ग्रस्त झाली. महिलेने शुक्रवारी १५ दिवसांच्या बाळाला फ्रिजरमध्ये ठेवलं. त्यानंतर झोपी गेली.

फ्रिजरमध्ये ठेवल्याने बाळ मोठमोठ्याने रडू लागली. बाळाचा रडल्याचा आवाज आल्याने घरातील इतर सदस्य खडबडून जागे झाले. फ्रिजर उघडल्यानंतर कुटुंबातील सदस्य हादरून गेले. त्यांनी तातडीने बाळाला फ्रिजरमधून बाहेर काढलं.

महिलेला मांत्रिकाकडे घेऊन गेलं तरी त्यावर काही परिणाम झालेला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी महिलेला डॉक्टरांकडे घेऊन गेले. मानसोपचारतज्ज्ञाने कुटुंबाला सांगितलं की, महिलेला पोस्टपार्टम सायकोसिस नावाचा आजार झाला आहे. महिला सध्या नैराश्यात गेली आहे. महिलेच्या कृत्याची सर्वत्र चर्चा होत आहे.

मानसोपचारतज्ज्ञाने पुढे सांगितलं की, 'महिलेला करत असलेल्या कृत्याची कोणतीही जाणीव होत नाहीये. ती स्वत:च्या मुलाला देखील नुकसान पोहोचू शकते. या मानसिक आजारात रुग्ण कमी झोपतो. महिलेवर उपचार सुरु आहेत'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

खासदाराच्या बहिणीचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ शूट, नंतर सासऱ्यानं भररस्त्यावर काठीनं मारलं; व्हिडिओ व्हायरल

Raigad Politics: आदिती तटकरे-भरत गोगावले खुर्चीला खुर्ची लावून बसले, कानात कुजबुजले, पालकमंत्रिपदाचा वाद मिटला?

Maharashtra Live News Update: 'सगेसोयरे' जीआर रद्द करण्याच्या मागणीसाठी धुळ्यात ओबीसी संघटना आक्रमक

Buldhana : शेतातून घरी परतत असताना दुर्दैवी अंत; नदीत पाय घसरून तरुणाचा बुडून मृत्यू

कोल्हापूर गॅझेटची आरक्षणाच्या लढाईत एन्ट्री; मराठा-कुणबी समाज एकच असल्याचा ऐतिहासिक उल्लेख|VIDEO

SCROLL FOR NEXT