देश विदेश

Hafiz Saeed Dead : भारताच्या मोठ्या शत्रूचा खात्मा? अमेरिकेने आंतरराष्ट्रीय दहशतवादीवर ठेवलं होतं 1 कोटी डॉलरचं बक्षीस,VIDEO

Hafiz Saeed killed : मोस्ट वॉन्टेड दहशतवादी हाफिज सईदचा खात्मा झालाय. होय ज्यानं पुलवामा , 26/11 अशा अनेक घटना पाकिस्तानात बसून घडवल्या, त्याच हाफिजचा पाकिस्तानमध्ये बसून गेम झाल्याची बातमी समोर येतेय. परंतु त्याच्या मृत्यूची पुष्टी अद्याप करण्यात आलेली नाही.

Snehil Shivaji

पाकिस्तानमध्ये बसून भारतात दहशवादी कारवाया करणाऱ्या हाफिज सईदचा पाकिस्तानातच आपल्या चेल्या चपाट्यांसोबत खात्मा झाल्याचा दावा करण्यात आलाय...शनिवारी रात्री पंजाब प्रांतातील झेलमधून आपल्या घरी जात असतांना हाफिज सईद आणि अबू कटालला अज्ञात हल्लेखोरांनी धडाधड गोळ्या झाडून संपवलं. हाफिजच्या हत्येनंतर लष्कर ए तोयबा आता सैरभैर झालीये. हाफिजच्या हत्येच्या बातम्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ माजलीये.

कोण आहे हाफिज सईद?

हाफिज सईद हा संयुक्त राष्ट्र आणि अमेरिकेनं घोषित केलेला आंतरराष्ट्रीय दहशतवादी आहे. लष्कर ए तोयबा आणि जमात-उद-दावा या दहशतवादी टोळीचा प्रमुख देखील आहे. तो मुंबई 26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड आहे. तसेच हाफिज पुलवामा हल्ल्याचा मुख्य सूत्रधार असल्याचेही पुरावे आहेत. अमेरिकेने हाफिजवर तब्बल 1 कोटी डॉलरचं बक्षीस ठेवलं होतं.

हाफिज सईदचा खेळ संपल्याची पाकिस्तानात दबक्या आवाजात चर्चा आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स आणि पाकिस्तानी हँडलवर हाफिज सईद ठार झाल्याचा दावा करण्यात येतोय. खुद्द इम्रान खान यांच्या पार्टीच्या एका नेत्यानं तसा दावा केलाय. त्यामुळे हाफिज सईद 'एक्स'वर ट्रेंडिंगमध्ये आहे.

याआधी देखील अनेकदा हाफिज सईद मारला गेल्याच्या अफवा पसरल्या होत्या. परंतु आता झालेला हा हल्ला खरा असून अजून पाकिस्ताननं या घटनेची पुष्टी केलेली नाही. त्यामुळे पाकमधील ट्विटर ट्रेंन्ड पाहता पाकला नापाक करणाऱ्या हाफिजचा खात्मा व्हावा, अशी पाकड्यांची इच्छा असल्याचं दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT