Morbi Cable Bridge Collapses Saam Tv
देश विदेश

Morbi Cable Bridge Collapses: मोरबी पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा 141 वर; प्रशासनाने दिले चौकशीचे आदेश

Shivani Tichkule

Gujrat News :  गुजरातच्या (Gujarat) मोरबी येथे रविवारी सांयकाळी मोठी दुर्घटना घडली आहे. मच्छु नदीवरील केबल ब्रिज कोसळला आहे. रविवारी झालेल्या या दुर्घटनेतील मृतांची संख्या 141 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 170 हून अधिक लोकांना वाचवण्यात यश आले आहे. बचाव कार्याच्या पथकाकडून आणि अधिकाऱ्यांकडून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. (Morbi Cable Bridge Collapses Latest Update)

लोकांना वाचवण्यासाठी रात्रभर बचावकार्य सुरू होते. तर ब्रिज मॅनेजमेंट कंपनीविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्याचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी सोमवारी सकाळी सांगितले की, या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला असून आयजीपी दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली तपास सुरू करण्यात आला आहे.

या घटनेनंतर नौदल, एनडीआरएफ, हवाई दल आणि लष्कराचे जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले. रात्रभर 200 हून अधिक जवान शोध आणि मदतकार्यात गुंतले होते. खुद्द गृहमंत्री अमित शाह मोरबी दुर्घटनेवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. रात्रभर ते पंतप्रधान कार्यालयाच्या संपर्कात होते. गुजरातचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनीही संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना घटनेची सर्व माहिती देण्यात आली.

अपघाताच्या वेळी पुलावर सुमारे ४०० ते ५०० जण उपस्थित होते, असे सांगण्यात येत आहे. सदर पूल जूना असून काही दिवसांपूर्वीच या केबल ब्रिजची दुरुस्ती करण्यात आली होती. सदर पुलाचे तीन दिवसांपूर्वीच उद्घाटन करण्यात आले होते. त्यामुळे हा पूल काही दिवसापूर्वीच खुला करण्यात आला होता. उद्घाटन झाल्यानंतर हा पूल कोसळल्यानं अनेक प्रश्नचिन्ह करण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मृतांचा कुटुंबियांना मदत जाहीर

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबाना पीएमएनआरएफ (PMNRF) निधीतून दोन लाख रुपये तर जखमींना 50 हजार रुपये जाहीर करण्यात आले आहे. तर गुजरतचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी मुख्यमंत्री निधीतून मृतांच्या नातेवाईकांना चार लाख रुपये तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election: राज्यात दोन दिवसांत विधानसभा निवडणूक होणार जाहीर? केंद्रीय निवडणूक आयोग महाराष्ट्रात दाखल

Israel Lebanon War: पश्चिम आशियात युद्धाचा भडका, इस्त्राईल-लेबनॉन संघर्ष कधी थांबणार?

Pune Crime: करणी केली आर्थिक प्रगती होत नाही; मग संधी साधत डोक्यात घातला दगड,भोर तालुक्यात घडला भयानक प्रकार

Maharashtra Politics: मित्रपक्षांना पाडलं तर भाजपच्या हातातून सत्ता जाईल, अमित शहा यांची कार्यकर्त्यांना कानपिचक्या; VIDEO

Health Tips: रिकाम्या पोटी खा २ लवंग, फायदे ऐकून व्हाल चकीत

SCROLL FOR NEXT