Maharashtra weather forecast with thunderstorm warning saam tv
देश विदेश

Weather Update: महाराष्ट्रासह २३ राज्यात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस; हवामान विभागाचा अलर्ट

Monsoon Weather Update: नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मान्सूनच्या) प्रगतीमुळे पुढील २४ ते ७२ तासांत महाराष्ट्र आणि इतर अनेक राज्यांमध्ये मेघगर्जनेसह आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.

Bharat Jadhav

  • हवामान विभागाने महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा जारी केला

  • पुढील 24 ते 72 तासांत वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि अतिवृष्टीची शक्यता

  • नैऋत्य मान्सून सक्रिय होत असल्याने देशातील बहुतांश भागांत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज

देशभरातील उष्णतेने हैरान झालेल्या नागरिकांना दिलासा देणारी बातमी हवामान विभागाने दिली आहे. नैऋत्य मोसमी पाऊस हळूहळू पुढे सरकत असून त्याचा परिणाम आता देशाच्या बहुतांश भागांमध्ये दिसून येत आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील २४ ते ७२ तासांत महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय.

१७ राज्यात हवामान विभागाचा अलर्ट

दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, हरियाणा, पंजाब, झारखंड, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि सिक्कीम या राज्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्रात कसे असणार हवामान?

मध्य महाराष्ट्रात ३० जून ते ५ जुलैपर्यंत अधूनमधून पाऊस होईल. यादरम्यान २ ते ३ जुलैला राज्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलीय. हवामान विभागानुसार, महाराष्ट्राच्या किनारपट्टीजवळील पूर्व-मध्य अरबी समु्द्रातील वरच्या वातावरणात चक्राकार वारे (सायक्लोनिक सर्क्युलेशन) सक्रिय असल्याने हवेतील आर्द्रता वाढली आहे. यामुळे राज्यात सतत पाऊस पडत आहे. परिणामी, आगामी दिवसांत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

दिल्ली-एनसीआरमध्येही होणार पाऊस

दिल्ली आणि एनसीआर (NCR) मधील नागरिकांनाही लवकरच उष्णता आणि दमट हवामानापासून दिलासा मिळणार आहे. हवामान खात्यानुसार अनेक भागांत मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर १ ते ४ जुलै दरम्यान पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. सततच्या पावसामुळे कमाल तापमानात ५ ते ६ अंश सेल्सिअसची घट होण्याचा अंदाज आहे. तरीही, सुरुवातीच्या दिवसांत काही भागांत उष्णतेची लाट कायम राहू शकते.

उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यात पाऊस

याचप्रमाणे उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यात पाऊस होणार आहे. युपीमध्ये ३ जुलैपर्यंत जोरदार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे. राज्यातील पश्चिम भागात २ जुलैपासून मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

बिहार आणि झारखंड हवामान कसे असणार?

बिहारमधील पाटणा, नवादा, गया, औरंगाबाद, सिवान, भोजपूर, शेखपुरा, लखीसराय, बक्सर, समस्तीपूर, दरभंगा, मधुबनी, पूर्णिया, कटिहार, किशनगंज, भागलपूर आणि मुंगेरसाठी मुसळधार पाऊस आणि मेघगर्जनेचा इशारा देण्यात आला आहे. ताशी ६५ ते ७० किलोमीटर वेगाच्या वाऱ्यासह मेघगर्जनेचा सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. झारखंडमध्ये १ जुलैला अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडेल. यासह इतर ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल असा अंदाज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पोलिसांचा आंदोलकांवर जबर लाठीचार्ज, जखमी विद्यार्थिनीची मृत्यूशी झुंज?

Maharashtra News Live Update: सोनिया गांधी दिल्लीतील मंदिर मार्ग पोलिस स्टेशनला पोहोचल्या

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर विरोधक ठाम, लाठीचार्जवरुन घमासान, संसद ठप्प

Weight Gain: 'किती बारीक आहेस!' असे टोमणे ऐकू वैतागलाय? मग वजन वाढवण्यासाठी करा हा सोपा घरगुती उपाय

अनधिकृत बॅनर्सवर ठाण्यात बुलडोझर! 8 दिवसांत 1524 अनधिकृत होर्डिंग्ज हटवले

SCROLL FOR NEXT