Rain Saam Tv
देश विदेश

आला रे... ! मान्सून केरळमध्ये दाखल; तळकोकणासह महाराष्ट्रात लवकरच

येत्या काही दिवसांत मान्सून केरळच्या उर्वरित भागासह कर्नाटक आणि महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे.

वृत्तसंस्था

Monsoon Update - हवामान खात्याचा मान्सूनबाबतचा अंदाज खरा ठरला आहे. आज 29 मे रोजी मान्सून केरळमध्ये (Kerala) दाखल झाला आहे. IMD नुसार, केरळमध्ये मान्सूनचे 3 दिवस आधी आगमन झाले आहे. आज सकाळी सकाळी साडेआठ वाजता केरळ राज्यातील अनेक भागात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांत मान्सून केरळच्या उर्वरित भागासह कर्नाटक आणि महाराष्ट्रात (Maharashtra) दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे.

हे देखील पाहा -

बंगालच्या उपसागरात ‘आसानी’ या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे या वेळी मान्सून वेळेआधीच केरळमध्ये होणार, असा अंदाज हवामान खात्याने यापूर्वी वर्तवला होता. मान्सूनच्या आगमनाने केरळमध्ये २९ मे ते १ जून या कालावधीत अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्याचवेळी 30 मे रोजी लक्षद्वीपमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. केरळमधील हवामान पुढील काही दिवस असेच राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.

हवामान खात्यानुसार, आज बिहार आणि झारखंडच्या अनेक भागात पाऊस पडू शकतो. बिहार आणि झारखंडमध्ये पुढील काही दिवस पाऊस आणि वादळी पावसाची शक्यता आहे. आता मान्सून पुढच्या सात दिवसात तळकोकणात दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यंदाही 4 ते 5 जूनपर्यंत मान्सून तळकोकणात दाखल होण्याचा अंदाज आहे. त्यानंतर मान्सून हळूहळू मुंबई, पुणे अन्य ठिकाणी दाखल होणार आहे. जूनमधील मान्सूनचा प्रवास पहिल्या दोन आठवड्यात मंदावलेला असेल, त्यानंतर तो सर्वत्र मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS TRANSFERS: राज्यातील पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती वाचा

ED Raids : माजी आयुक्त अनिलकुमार पवारांच्या घरी ईडीचा छापा; संपत्ती जाणून डोळे पांढरे होतील, वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Live News Update: ठाण्याच्या नवीन जिल्हाधिकारी म्हणून श्रीमंती अशिमा मित्तल यांची नियुक्ती

Tariff : ट्रम्पचा धक्का, भारताला फटका? कोण-कोणत्या उद्योगांवर होणार परिणाम, जाणून घ्या

Ladki Bahin Yojana : राज्यातील ५० लाख बहिणी अपात्र ठरल्या; काय आहे नेमकं कारण? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT