Monkey Attacks Viral Video Saam Tv
देश विदेश

Monkey Attacks : माकडाला त्रास देणं पडलं महागात; महिलेची झाली भलतीच फजिती, VIDEO Viral

माकडाने तिची जी अवस्था केली, ते पाहून महिला आयुष्यात कदाचित कधीच माकडाच्या जवळही जाणार नाही.

Shivani Tichkule

Monkey Attacks on a Woman : सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ मजेशीर तर काही थक्क करणारे असतात. माणसानंतर माकडाला (Monkey) जगातील सर्वात बुद्धिमान प्राणी मानलं जातं. माकडं अगदी माणसासारखीच कृती करतात. कधी कुणी त्यांच्या वाटेला गेलं, ते त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहत नाही. सध्या सोशल मीडियावर अशाच एका माकडाचा व्हिडीओ व्हायरल होतोय. (Funny Viral Video)

या व्हिडीओत एका महिला पर्यटकाला माकडाची छेड काढणं चांगलंच महागात पडल्याचं पाहायला मिळालं. महिलेनं (Woman) नक्की काय विचार करून माकडाची छेड काढली, हे माहिती नाही. मात्र, यानंतर माकडाने तिची जी अवस्था केली, ते पाहून (Shocking Video) ती आयुष्यात कदाचित कधीच माकडाच्या जवळही जाणार नाही.

व्हिडीओत एक महिला पर्यटक एका ब्रीजवर उभी असल्याचं दिसत आहे. तेथे उभे राहून ती माकडला डिवचण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. महिलेच्या या कृतीचा माकडाला राग आला आणि त्याने थेट संधी साधून तिचे केस ओढण्यास (Attacks) सुरूवात केली. इतकंच नाही तर या खट्याळ माकडाने महिलेवर थोडाफार हातही साफ केला. (Monkey Attacks Funny Video)

व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की माकडाने महिलेचे केस घट्ट पकडून ठेवले आहेत. महिला माकडापासून वाचण्याचा प्रयत्न करते. मात्र, माकड काही तिला सोडण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीये. माकडापासून बचावासाठी ही महिला आरडाओरड करते.

या महिलेचा आवाज ऐकून तिच्यासोबत असलेला एक तरुण तिकडे धाव येतो. महिलेच्या मदतीला तरुण धावत येत असल्याचं बघताच, माकड तिचे केस सोडतं आणि तेथून पळ काढतं. या महिलेची अवस्था पाहून काही जणांना तिच्यासाठी वाईट वाटत आहे, तर काहीजण हा व्हिडिओ पाहून खळखळून हसत आहेत.

पर्यटकावर माकडाने हल्ला केल्याचा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर wildlife_fantastic नावाच्या पेजवरून शेअर करण्यात आला आहे. आठवड्यापूर्वी अपलोड केलेला हा व्हिडिओ २८ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केला आहे. ही संख्या सातत्याने वाढत आहे. तर हा व्हिडिओ पाहून अनेकजण यावर निरनिराळ्या प्रतिक्रियाही देत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT