Mongoose VS King Cobra Fight Video  Saam TV
देश विदेश

Snake - Mongoose Video : किंग कोब्रा आणि मुंगूसमध्ये झालं घमासान युद्ध; शेवट पाहून सर्वांनाच धक्काच बसला

Satish Daud

Viral Video : साप आणि मुंगूसाचे वैर सर्वांनाच माहित आहे. सोशल मीडियावर साप आणि मुंगूसाच्या भांडणाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. तसं पाहता साप आणि मुंगूसाच्या भांडणात नेहमीच मुंगूसच सापाची शिकार करतो. मात्र, एका व्हिडीओत चक्क सापानेच मुंगूसावर हल्ला चढवत त्याची शिकार केली आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी हैराण झाले आहेत. आतापर्यंत हा व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला आहे. (Latest Marathi News)

साप आणि मुंगूस हे एकमेकांचे कट्टर वैरी मानले जातात. आजवर अनेक टीव्ही मालिका, चित्रपट किंबहूना अॅनिमल शोमध्ये तुम्ही या दोन प्राण्यांची लढाई पाहिली असेल. या दोघांमध्ये होणाऱ्या लढाईला सर्वसाधारपणे ‘गेम ऑफ डेथ’ म्हणतात. कारण जिवंत राहायचं असेल तर प्रतिस्पर्धाचा जीव घेणं हाच एक उपाय दोघांकडे असतो.

व्हिडीओत काय आहे?

व्हायरल झालेला व्हिडीओ एका डोंगराळ भागातील असल्याचं दिसत आहे. किंग कोब्रा (Snake) आणि मुंगूसाच्या घमासान युद्धाचा हा थरार एका व्यक्तीने आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो एक सुमसाम रस्ता आहे लोकांची वर्दळ दिसत नाहीये. इतक्यात एक नाग आणि एक मुंगूस समोरासमोर आले काही क्षणातच दोघांचं युद्ध सुरु झालं.

कोब्रा हल्ला करत असताना मुंगूस मोठ्या चपळाईने बचाव करताना दिसून येत आहे. कोब्रा हा कितीही विषारी असला तरी त्याच्या विषाचा मुंगूसावर मात्र त्याचा काहीच फरक पडत नाही. मग कोब्रा नवी युद्धनिती खेळतो. तो हळूहळू मुंगूसाला वेटोळे घालतो. अन् त्याला काही कळायच्या आतच फास घट्ट करतो. परिणामी मुंगूसाचा अक्षरश: गुदमरून मृत्यू होतो.

 व्हिडीओ (Viral Video) झालेला हा व्हिडीओ @animals_powers या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ ३ लाखांहून अधिक लोकांनी बघितला आहे. ही लढाई पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय. कारण मुंगूस साप वेटोळे घालेपर्यंत इतका गाफील कसा काय राहिला? हा प्रश्न काही जणांनी पडलाय, तर काहींनी या सापाच्या चपळतेचं कौतुक केलंय.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sri Lanka Tourism : श्रीलंकेत मनसोक्त आणि कमी खर्चात फिरता येणार; कसं वाचा संपूर्ण डिटेल्स

IOCL Recruitment: इंडियन ऑइलमध्ये अधिकारी होण्याची संधी; या पदासाठी सुरु आहे भरती; वाचा संपूर्ण माहिती

Nandurbar News : नंदुरबार दंगल..दगडफेक करणाऱ्या ४० जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात; शहरात तणावपूर्ण शांतता

Manoj Jarange Patil: उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती खालावली; मनोज जरांगेंचा उपचार घेण्यास नकार

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

SCROLL FOR NEXT