वृत्तसंस्था : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet expansion) आज सायंकाळी सहा वाजता होणार असून नवीन मंत्रिमंडळ कसे असेल याची ब्लू प्रिंट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चार माजी मुख्यमंत्र्यांना मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे. यात 13 वकील, सहा डॉक्टर, पाच अभियंते असतील. विशेष म्हणजे तरुणांना मंत्रिमंडळात स्थान देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मोदींच्या नव्या मंत्री मंडळात 14 मंत्री असतील ज्यांचे वय 50 वर्षांपेक्षा कमी असेल.
मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात चार माजी मुख्यमंत्री यांच्यासह 18 माजी राज्यमंत्री असतील. त्याचबरोबर 39 माजी आमदारांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे. त्याचबरोबर तीन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा विजय मिळविलेल्या 23 खासदारांनाही मंत्रीमंडळात स्थान मिळणार आहे.
यात नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळात एससी प्रवर्गातील 12 सदस्य असतील. त्यातील दोन जण मंत्रिमंडळातील दोन जण असतील. तर आठ सदस्य अनुसूचित जमातीचे असतील तर त्यापैकी तिघांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाईल. तसेच मंत्री मंडळात विस्तारात 27 ओबीसी नेत्यांचा समावेश असून त्यातील पाचजण मंत्रिमंडळात असतील. मंत्रिमंडळात व्यावसायिकांच्या संख्येत भरीव वाढ होणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, मंत्रिमंडळ विस्तारात मोदी मंत्रिमंडळाचे सरासरी वय खाली आणण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आल्याचे समोर आले आहे.
मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात 5 अल्पसंख्याक मंत्री असतील. यात 1 मुस्लिम, 1 शीख, 2 बौद्ध, 1 ख्रिश्चन असतील. मंत्रिमंडळात 27 ओबीसी मंत्री असतील, त्यातील 5 कॅबिनेट मंत्री केले जातील. यासह 8 अनुसूचित प्रवर्गातील असतील, त्यापैकी 3 जणांना कॅबिनेट मंत्री दर्जा मिळणार आहे. अनुसूचित जातींमध्ये 12 अनुसूचित जाती असतील, त्यापैकी 2जणांना कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा देण्यात येईल.
Edited By- Anuradha
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.