Sharad Pawar Saam Tv
देश विदेश

PM मोदींसोबत 'या' २ मुद्द्यांवर झाली चर्चा; शरद पवारांनीच केलं स्पष्ट

मागच्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांवर ईडी, सीबीआय, आयटी यांची कारवाई होत आहे.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: राष्ट्रावादीचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांनी आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची संसद भवनात भेट घेतली. त्यांनतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. भेट नक्की कोणत्या कारणामुळे झाली, भेटीत नक्की काय झाले? असे प्रश्न सर्वांना पडले होते. परंतु आता शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषद घेत या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. यावेळी त्यांनी संजय राऊतांच्या कारवाईवरही पंतप्रधानांशी चर्चा झाल्याचे पवारांनी सांगितले. त्याचबरोबर अनेक दिवसांपासून प्रलंबीत असलेल्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा प्रश्नही पंतप्रधानांच्या कानावर टाकल्याचे शरद पवार म्हणाले.

''कारवायांविरोधात आम्ही लढा देत राहू''

मागच्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांवर ईडी, सीबीआय, आयटी यांची कारवाई होत आहे. ही कारवाई राजकीय हेतूपोटी केली जात असल्याची टीका राज्यातील सत्ताधारी नेते करत आहेत. आज झालेल्या भेटीत शरद पवार या कारवायांविषयी पंतप्रधानांशी बोलले असतील अशी चर्चा होती, परंतु महाराष्ट्रातील कारवायांविरोधात पंतप्रधानांशी कुठलीही चर्चा न झाल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केले आहे. आणि पुढे ते म्हणाले की केंद्रीय तपास यंत्रणांविरोधात राष्ट्रवादी- शिवसेनेने (NCP-Shivsena) आवाज उठवला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या विरोधात आम्ही असाच लढा देत राहू असंही शरद पवार म्हणाले.

'राऊतांवर कारवाईची गरज काय?'

संजय राऊतांवर कारवाई करायची काय गरज होती? असा सवाल करत आपण आज पंतप्रधानांशी केवळ १२ आमदाराच्या प्रश्नावर चर्चा केली असून ते विचार करुन निर्णय घेतील असं वक्तव्य शरद पवारांनी केलं आहे. मात्र यावेळी नवाब मलिकांवरील कारवाईवर कोणतीही चर्चा झाली नसल्याचही शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. ते पुढे म्हणाले राष्ट्रवादी आणि शिवसेना भाजपविरोधात उभी आहे. आम्ही कधीच भाजप सोबत नव्हतो असंही पवार म्हणाले. (Sharad Pawar Meet Narendra Modi)

भाजप-राष्ट्रवादी युतीवर पवार म्हणाले....

भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आमचा फक्त शिवसेनेसोबत वाद आहे, राष्ट्रवादीसोबत आमचं चांगलं आहे असे वक्तव्य केले होते. त्यानंतर राष्ट्रवादी-भाजप युतीच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. परंतु आता खुद्द शरद पवारांनी याचं उत्तर दिले आहे. आम्ही कोणाचंही ऐकून भाजपसोबत युती करणार नाही. राष्ट्रवादी-शिवसेना भाजपविरोधात उभी आहे आणि आम्ही लढा देत राहू असेही पवार म्हणाले.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Spruha Joshi In Saree: खूपच सुंदर दिसतेस स्पृहा जोशी, सौंदर्याकडे सगळ्यांच्या नजरा वळल्या

India vs South africa : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; ऋषभ पंतकडे कर्णधारपदाची जबाबदारी

Maharashtra Live News Update : लातूरमध्ये हॉटेल व्यवसायकावर धारदार शस्त्राने हल्ला

Vashi Fire: नवी मुंबईत मोठ्या इमारतीत भीषण आग; चिमुकलीसह चौघांचा मृत्यू, घटनेमागे वेगळंच कारण समोर

Dia Mirza: दिवाळी स्पेशल अभिनेत्री दीया मिर्झाचा शाही लूक, पाहा PHOTO

SCROLL FOR NEXT