PM Modi
PM Modi SAAM TV
देश विदेश

PM Modi : मोदी सरकारच्या काळात दहशतवादाचा खात्मा; 2014 नंतर मृत्यूंमध्ये ८० टक्के घट

Nandkumar Joshi

PM Narendra Modi On Terrorism : केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली. सरकारनं दहशतवादाविरोधात अनेक मोठी आणि ठोस पावलं उचलल्याचं त्यांनी सांगितलं. सन २०१४ नंतर नागरिकांच्या मृत्यूच्या संख्येत ८० टक्क्यांची घट झाली आहे. दहशतवादावर सरकारचं झिरो टॉलरन्स धोरण आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी घटनांत १६८ टक्क्यांची घट झाली आहे, असं अनुराग ठाकूर यांनी सांगितलं.

अनुराग ठाकूर यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावर पत्रकार परिषदेत माहिती दिली. दहशतवादाचा खात्मा करण्याचं धोरण मोदी सरकारचं आहे. भारतात दहशतवाद खिळखिळा करण्यात आम्ही कोणतीही कसर सोडली नाही. २०१६ मधील सर्जिकल स्ट्राइक आणि २०१९ मधील बालाकोटमध्ये आम्ही केलेली कारवाई हे त्याचे पुरावे आहेत, असंही ठाकूर म्हणाले. (PM Narendra Modi)

ईशान्येकडे शांततेचं युग

अनुराग ठाकूर म्हणाले की, ईशान्येकडे शांततेचं युग आलं आहे. २०१४ नंतर दहशतवादी घटनांमध्ये ८० टक्क्यांची घट झाली आहे. २०१४ नंतर ६ हजार दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे.  (Latest Marathi News)

ईशान्येकडील बहुतांश भागातून AFSPA हटवण्यात आला आहे. आसाममधील बऱ्याचशा भागांत हटवला आहे. रेस्क्यू ऑपरेशनला मोदी सरकारचं प्राधान्य आहे. ऑपरेशन गंगा अंतर्गत युक्रेनमध्ये युद्धकाळात अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुरक्षित मायदेशी आणण्यासाठी १ फेब्रुवारीपासून देवी शक्ती अफगाणिस्तानातून सुरू केले होते, असेही त्यांनी सांगितले.

पाकिस्तानवर निशाणा

जगात भारताची ओळख एक मदत करणारा देश म्हणून झालेली आहे. तर शेजारी देशाची ओळख ही दहशतवादाला खतपाणी घालणारा देश म्हणून झाली आहे. त्यांचा खरा चेहरा जगासमोर आलाय, अशा शब्दांत ठाकूर यांनी पाकिस्तानवर निशाणा साधला.

सायबर गुन्ह्यांच्या बाबतीतही अनुराग ठाकूर यांनी भाष्य केलं. नव्या तंत्रज्ञानाच्या काळात सायबर गुन्हे हे एक मोठे आव्हान आहे. हे गुन्हे रोखण्याचे काम सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: २४७५ अधिकारी, २२१०० अंमलदार आणि ६२०० होमगार्ड; मतदानासाठी मुंबई पोलीस सज्ज

Sanjay Raut News: संजय राऊत यांच्यावर अहमदनगरमध्ये गुन्हा दाखल! नेमकं कारण काय?

Breaking: मोठी बातमी! आता पुणे सोलापूर मार्गावर होर्डिंग कोसळून अनेक गाड्यांचं प्रचंड मोठं नुकसान

Pune Hoarding Collapse: पुणे-सोलापूर रोडवरील भलं मोठं होर्डिंग कोसळलं; अनेक वाहनांसह घोडा अडकला

Maharashtra Rain News : राज्यात आजही अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्याचा तडाखा; केळीच्या बागा भूईसपाट, विदर्भाला अतिवृष्टीचा इशारा

SCROLL FOR NEXT