नवी दिल्ली : चीनची सीमाभागात वाढलेली दादागिरी भारतासाठी चिंतेचा विषय आहे. चीन सातत्यांना भारतीय हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न करत आहे. भारतीय सैनिक चीनी सैनिकांना जशास तसं उत्तर देतात. पण भारतीय म्हणून आपण देखील चीनला धडा शिकवू शकतो.
म्हणूनच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी जनतेला चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. चिनी उत्पादनांच्या तुलनेत त्याची किंमत दुप्पट असली तरी आम्ही चिनी उत्पादने खरेदी करणार नाही तर स्वदेशी उत्पादने घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. (Latest Marathi News)
अरविंद केजरीवाल यांनी चीनमधून होणाऱ्या आयातीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि भाजपला चांगलेच घेरले आहे. त्यांनी देशातील जनतेला चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. गेल्या काही वर्षांपासून चीन भारतावर वाकडी नजर टाकत आहे. चीन आपल्यावर वेळोवेळी छोटे-मोठे हल्ले करत असतो. चीनचे आर्थिक कंबरडे मोडण्याचा मास्टर प्लॅनही त्यांनी सांगितला.
अरविंद केजरीवाल म्हणाले की, देशाचे सैनिक सीमेवर चीनविरुद्ध जोरदार लढा देत आहेत. अनेक जवान शहीदही झाले. त्यानंतर चीनने काही किलोमीटर आत घुसल्याची माहिती मिळत आहे. भारत सरकार म्हणते की सर्व काही ठीक आहे. सरकार नीट बोलत नाही, असे माध्यमांमध्ये येत आहे. एकीकडे लष्कर चीनशी जोरदार लढत आहे.
चीन एकीकडे कुरघोड्या करत आहे तर मोदी सरकारने चीनकडून ९६ अब्ज डॉलर्स म्हणजेच ७.५ लाख कोटी रुपयांच्या वस्तू खरेदी केल्या.चीनकडून जास्त वस्तू विकत घेण्याची सक्ती काय? केंद्र सरकारची काय मजबुरी आहे, भारतीय जनता पक्षाची काय मजबुरी आहे? एकीकडे आपल्या सैनिकांचा सीमेवर जीव जात आहे आणि दुसरीकडे चीनला बक्षीस देऊन चीनकडून आणखी वस्तू खरेदी करत आहेत? का? तुम्ही इतर कोणते सामान खरेदी करत आहात? आपण हे पदार्थ बनवू शकत नाही का? चीनमधून स्वस्तात येणाऱ्या आम्हाला नकोत, असं देखील केजरीवाल यांनी म्हटलं.
जगातील सर्व लोकांना भारतात गुंतवणूक करण्याचं आवाहन करा. जमीन आणि सुविधा द्या. मी हमी देतो की चीनला आयात करण्याऐवजी आपण वस्तू निर्यात करू. तुम्ही भारतातील लोकांना हाकलून देता आणि तुम्ही चीनला मिठी मारता, अशी टीकाही केजरीवालांना केंद्र सरकारवर केली.
केजरीवाल पुढे म्हणाले की, त्यांना आमच्या जवानांचीही पर्वा नाही. चीनमधून येणारा माल स्वस्त असल्याचे सांगितले जाते. आम्हाला स्वस्त वस्तू नको आहेत. भारतीय वस्तू कितीही महाग बनवल्या तरी आम्ही खरेदी करू. दुप्पट किमतीतही माल आपल्या देशात बनत असेल तर आपण खरेदी करू. पण चीनकडून वस्तू खरेदी करणे बंद करा. मी देशातील जनतेला चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन करतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.