मोदी सरकारची Air India नंतर आणखी एका मोठ्या कंपनीच्या विक्रीला मंजुरी ! Saam Tv
देश विदेश

मोदी सरकारची Air India नंतर आणखी एका मोठ्या कंपनीच्या विक्रीला मंजुरी !

मोदी सरकार ने Air India नंतर दुसरी एका मोठ्या कंपनीच्या विक्रीला मंजुरी दिली आहे.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - सोमवारी मोदी सरकारने आणखी एक कंपनी विकण्याचा निर्णय घेतला आहे. सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लि. म्हणजेच सीईएल (Central Electronics Ltd) नंदल फायनान्स अँड लीजिंगला (Nandal Finance and Leasing) तब्बल २१० कोटी रुपयांत विकण्यास मंजुरी दिली आहे. चालू आर्थिक वर्षातील (Economic Year) ही दुसरी स्‍ट्रॅटेजिक डिसइन्‍वेस्‍टमेंट (Strategic Disinvestment) आहे. सरकारने नुकतीच एअर इंडियाच्या (Air India) संचालनाची जबाबदारी टाटाला (Tata Industries) दिली होती. एअर इंडियानंतरची ही दुसरी धोरणात्मक विक्री आहे.

सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लि. ची १९७४ मध्ये झाली होती स्थापना;
सायन्स अँड टेक्‍नोलॉजी मिनिस्‍ट्री अंतर्गत येणाऱ्या सीईएलची (CEL) स्थापना १९७४ मध्ये झाली होती. ही कंपनी, सौर फोटोव्होल्टिक (SPV) क्षेत्रात अग्रगण्य आहे. CEL हे वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभाग (DSIR) अंतर्गत केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे. रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांचा धोरणात्मक निर्गुंतवणुकीच्या पर्यायी यंत्रणेत समावेश आहे.

'या' दोन कंपन्यांनी लावली होती बोली -
मोदी सरकारने ३ फेब्रुवारी २०२० रोजी लेटर ऑफ इंटेंट (Letter of intent) मागवले होते. यानंतर यासाठी तीन लेटर ऑफ इंटेंट मिळाले होते मात्र, यांपैकी केवळ नंदल फायनान्स अँड लीजिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने आणि जेपीएम इंडस्ट्रीज लि. या दोनच कंपन्यांनी १२ ऑक्टोबर २०२१ रोजी त्यांची आर्थिक बोली सादर केली. गाझियाबादच्या Ghaziabad नंदल फायनान्स अँड लीजिंग प्रा. लि. कडून यासाठी २१० कोटी रुपयांची बोली लावली होती, तर दुसऱ्या कंपनीने जेपीएम इंडस्ट्रीजने १९० कोटी रुपयांची बोली लावली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT