लग्नासाठीच मुलींच किमान वय वाढणार? मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत Saam Tv
देश विदेश

लग्नासाठीच मुलींच किमान वय वाढणार? मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

मुलीचे लग्नासाठीचे किमान वय वाढवण्याशी संबंधित एका विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटने मंजुरी देण्यात आली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : मुलीचे लग्नासाठीचे किमान वय वाढवण्याशी संबंधित एका विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटने मंजुरी देण्यात आली आहे. लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Prime Minister Narendra Modi) याविषयीचे संकेत दिले होते. मुलींचे लग्नाचे किमान वय सध्या १८ वर्ष आहे. ते वाढवून २१ करण्याचा सरकारचा (government) विचार आहे. त्याकरिताची तयारी सरकारने सुरुवात केली आहे.

हे देखील पहा-

याविषयीचे विधेयक याच अधिवेशनामध्ये मांडले जाण्याची शक्यता आहे. सध्या संसदेचे (Parliament) हिवाळी अधिवेशन सुरू आहे. लग्नाचे किमान वय वाढवण्याकरिता बाल विवाह कायद्यामध्ये सुधारणा केली जाणार आहे. या कायद्यामध्ये सध्या मुलींचे लग्नाकरिता किमान वय १८ वर्षे आहे. कायद्यामध्ये बदल करण्याकरिता सुधारणा विधेयकाला बुधवारी झालेल्या कॅबिनेटमध्ये (cabinet) मंजुरी देण्यात आली आहे.

पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली आहे. मुलींच्या लग्नासाठी (marriage) किमान वयाबद्दल निर्णय घेण्यासाठी मागील वर्षी एका टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली होती. त्या टास्क फोर्सने लग्नासाठीचे किमान वय १८ वर्षावरून २१ वर्षे करण्याचा सल्ला दिला होता. माजी खासदार (MP) जया जेटलींच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्य दिनी देशाला लाल किल्ल्यावरून संबोधित केले होते. त्यावेळी मोदींनी भाषणात लग्नासाठीचे किमान वय वाढवण्याविषयी संकेत दिले होते. सध्याची परिस्थिती बघता लग्नाचे वय वाढवण्यासंदर्भामध्ये विचार व्हायला हवा, असे मोदी म्हणाले होते.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आषाढी वारीपूर्वी पंढरपुरात वरुणराजाचा जलाभिषेक; वारकऱ्यांची एकच धावपळ

Pune : पुण्यात टँकरवर आता ऑनलाइन नजर, राज्यभर योजना राबवली जाणार, पाहा सरकरचा नेमका प्लान काय?

Samarth Movie: समर्थ रामदास स्वामींच्या विचारांची आधुनिक काळाशी सांगड; 'समर्थ' चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित

Palazzo Design for Monsoon: पावसाळ्या कम्फर्टेबल आणि स्टायलिश लूकसाठी ट्राय करा हे ७ ट्रेंडी पलाझो डिझाइन्स

AI TECH : लवकरच बाजारात येणार ChatGPT-पावर्ड स्मार्ट स्पीकर , AI Assistant ची लुटता येणार मज्जा

SCROLL FOR NEXT