Modi government banned 22 YouTube channels for spreading fake news Saam Tv
देश विदेश

मोदी सरकारचा जबरा स्ट्राइक! २२ युट्यूब चॅनल केले ब्लॉक, यादी वाचा!

YouTube channels Ban News: 'भविष्यातही भारताविरोधात कट रचणे, खोटेनाटे पसरवणे आणि समाजात फूट पाडणाऱ्या अशा अनेक चॅनलवर कारवाई करण्यात येईल,' असे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून सांगण्यात आले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली: देशाची सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सरकारी आदेशांबाबत चुकीची माहिती पसरवणाऱ्या युट्यूब चॅनलवर (YouTube channels) केंद्रातील मोदी सरकारनं (Modi Government) कारवाईचा बडगा उगारला आहे. केंद्र सरकारकडून २२ युट्यूब चॅनल ब्लॉक (Block) करण्यात आले आहेत. त्यात चार पाकिस्तानी चॅनलचा देखील समावेश आहे. त्याचबरोबर तीन ट्विटर अकाउंट, एक फेसबुक अकाउंट आणि एक न्यूज वेबसाइट (वृत्त संकेतस्थळ) ब्लॉक करण्यात आली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं ही धडक कारवाई केली आहे. हे सर्व चॅनल चुकीची माहिती पसरवत असल्याचा आरोप आहे. (Modi government banned 22 YouTube channels for spreading fake news)

हे देखील पहा -

केंद्र सरकारने कारवाई केलेले चॅनल लोकांमध्ये गैरसमज पसरवत असल्याचा आरोप आहे. या ब्लॉक केलेल्या सर्व चॅनलचे तब्बल २६० कोटी व्ह्यूज आहेत. अशा प्रकारचे अन्य चॅनलही ब्लॉक केले जाण्याची शक्यता आहे. 'भविष्यातही भारताविरोधात कट रचणे, खोटेनाटे पसरवणे आणि समाजात फूट पाडणाऱ्या अशा अनेक चॅनलवर कारवाई करण्यात येईल,' असे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून सांगण्यात आले. मंत्रालयाकडून यापूर्वी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये आणि यावर्षी जानेवारीत अशाच प्रकारची कारवाई करण्यात आली होती.

कोणकोणत्या युट्यूब चॅनलवर केली कारवाई

केंद्र सरकारने ब्लॉक केलेल्या युट्यूब चॅनलमध्ये चार पाकिस्तानी चॅनलचाही समावेश आहे. एओपी न्यूज, एआरपी न्यूज, एलडीसी न्यूज, सरकारी बाबू, एसएस जोन हिंदी, ऑनलाइन खबर, पीकेबी न्यूज, बोराना समाचार, डीपी समाचार, डीजी गुरुकुल, दिनभरकी खबरे आदी चॅनलचाही समावेश आहे.

भारताविरोधात दुष्प्रचार आणि खोट्या बातम्या पसरवल्याप्रकरणी गेल्या महिन्यात २० युट्यूब चॅनल आणि दोन वेबसाइट ब्लॉक करण्यात आल्या होत्या. त्यानंतर माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी अशा चॅनलना इशारा दिला होता. देशाच्या विरोधात कट रचणाऱ्यांविरोधात अशाच प्रकारची कारवाई केली जाईल, असा इशारा त्यावेळी ठाकूर यांनी दिला होता.

Edited By - Nandkumar Joshi

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: गडचिरोली जिल्ह्यात भीषण अपघात; चार जणांचा मृत्यू

Mhada 2025 : म्हाडाकडून मुंबईतील १४९ अनिवासी गाळ्यांचा ई-लिलाव; नोंदणी अन् अर्ज कुठे कराल? जाणून घ्या

Kapil Sharma: रिंग ऐकली नाहीतर पुढचा हल्ला मुंबईत; कॅफेवरील गोळीबारनंतर कपिल शर्माला धमकी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना लवकरच २,१०० रुपये मिळणार, महायुतीतील मंत्र्याचं मोठं विधान

Maharashtra Politics: युतीसाठी आम्ही सक्षम, उद्धव ठाकरे गरजले, युतीबाबत इंडियाच्या अटी-शर्ती नाहीत'

SCROLL FOR NEXT