AAP MP Raghav Chadha speaking during the Zero Hour in Parliament demanding the Right to Recall law. saam tv
देश विदेश

आता आमदार, खासदारही बरखास्त होणार! काय आहे 'राईट टू रिकॉल कायदा? कोणी केली नव्या कायद्याची मागणी?

What is Right to Recall Law : 'राईट टू रिकॉल' कायदा म्हणजे काय आणि तो मतदारांना काम न करणाऱ्या आमदार आणि खासदारांना काढून टाकण्याची परवानगी देऊ शकतो का? ते जाणून घेऊ. या कायद्याची मागणी केली आहे ते जाणून घेऊ.

Bharat Jadhav

  • 'राईट टू रिकॉल’ कायद्यामुळे आमदार व खासदारांनाही हटवता येण्याची शक्यता.

  • ग्रामपंचायत स्तरावर ही व्यवस्था आधीच अस्तित्वात आहे.

  • राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी संसदेत मागणी केली.

महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि राजस्थान यांसारख्या राज्यांमध्ये ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसभेच्या माध्यमातून प्रतिनिधींना हटवण्याची तरतूद आहे. अशीच व्यवस्था विधानसभा आणि लोकसभेसाठी करण्यात यावी अशी मागणी केली जातेय. काम न करणाऱ्या आणि आश्वासने पाळणाऱ्या खासदार आणि आमदारांना मतदारांनी पदावरून हटवण्याची ताकद देणारा 'राईट टू रिकॉल' कायदा देशात लागू करण्यात यावा, अशी मागणी राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी केली आहे.

राघव चड्ढा आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार आहेत. बजेट सत्र २०२६ दरम्यान शून्य प्रहरात बोलताना राघव चड्ढा यांनी लोकशाहीतील एका मोठ्या त्रुटीवर बोट ठेवले. देशातील लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी या नवीन व्यवस्थेची गरज असल्याचे म्हटलं आहे. निवडणुकांआधी नेते जनतेच्या मागे असतात, पण निवडणूक जिंकल्यावर जनता नेत्यांच्या मागे धावत असते. ही परिस्थिती बदलणे आवश्यक आहे.

पाच वर्षांचा कार्यकाळ खूप मोठा असतो. जर एखाद्या क्षेत्रातील जनतेने चुकीचा प्रतिनिधी निवडला, तर त्यांना पाच वर्षे पश्चातापाशिवाय दुसरा पर्याय नसतो. त्यामुळे 'राईट टू रिकॉल' हा राजकारण्यांविरुद्धचे शस्त्र नसून ते लोकशाहीचा विमा असल्याचे राघव चड्ढा म्हणाले. कॅनडा आणि स्वित्झर्लंडसह जगातील २४ हून अधिक लोकशाही देशांमध्ये ही व्यवस्था अस्तित्वात आहे. त्याचप्रमाणे भारतातही हे व्यवस्था लागू करण्यात आली पाहिजे.

दरम्यान भारतातही राष्ट्रपतींवर महाभियोग चालवणे, उपराष्ट्रपतींना हटवणे किंवा न्यायाधीशांना पदावरून हटवण्यासाठी कायदे आहेत. यासह सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणण्याचीदेखील तरतूद आहे. मग मतदारांना काम न करणाऱ्या प्रतिनिधींना परत बोलावण्याचा आणि न काम करणाऱ्यांना हटवण्याचा अधिकार का नसावा? असा सवाल राघव चड्ढा यांनी उपस्थित केला.

यावेळी राघव चड्ढा यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांचा दाखला दिला.कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान या राज्यांमध्ये ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसभेच्या माध्यमातून प्रतिनिधींना हटवण्याची तरतूद आहे. अशीच व्यवस्था संसद आणि विधानसभेसाठीही लागू करण्याची वेळ आल्याच असे चड्ढा म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: डॉक्टरकडूनच नवजात बाळाची विक्री, तस्करीचं मोठं रॅकेट उघड; भंडारा हादरले

पवार कुटुंब दिल्लीत, विलिनीकरणाला वेग? सुनेत्रा पवारांनी घेतली मोदी-शाहांची भेट

Sunetra Pawar: मोठी बातमी! सुनेत्रा पवार होणार राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा; अध्यक्ष निवडीचा मुहूर्तही ठरला?

अजितदादांची राजकीय हत्या? रोहित पवारांच्या आरोपाने खळबळ, VIDEO

महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना छत्रपती शिवराय अन् बाळासाहेब ठाकरेंचा विसर; किशोरी पेडणेकर यांचा जोरदार हल्लाबोल

SCROLL FOR NEXT