गोव्याच्या राजकारणात उलथापालथ! माजी मुख्यमंत्र्यांचा काँग्रेसला रामराम Saam TV
देश विदेश

गोव्याच्या राजकारणात उलथापालथ! माजी मुख्यमंत्र्यांचा काँग्रेसला रामराम

गोव्याचे माजी मुख्यमंत्री व गांधी घराण्याचे जवळचे असलेले काँग्रेसचे आमदार लुईझीन फालेरो यांनी आज आपण मोठी घोषणा करणार असल्याचा गाजावाजा केला होता.

अनिल पाटील

पणजी: गोव्याचे माजी मुख्यमंत्री व गांधी घराण्याचे जवळचे असलेले काँग्रेसचे आमदार लुईझीन फालेरो यांनी आज आपण मोठी घोषणा करणार असल्याचा गाजावाजा केला होता. काँग्रेस पक्षाचा आणि आमदारकीचा राजीनामाही दिला. मात्र पत्रकार परिषदेत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याबाबत काहीही सांगितले नाही. आज पणजी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते तृणमूल पक्षामध्ये दाखल होणार असल्याची सर्वत्र जाहीर चर्चा होती. मात्र त्या चर्चांना फाटा देत आपण लवकरच आपला पुढील निर्णय जाहीर करणार असल्याचे सांगितले. तसेच आपण काँग्रेस पक्ष सोडलेला असला तरी आपण काँग्रेसमन आहे असे सांगून सर्वांनाच बुचकळ्यात टाकले आहे.

आज त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस एडवोकेट यतीश नाईक, विजय पै, आनंद नाईक आदी काँग्रेसचा राजीनामा दिलेले पदाधिकारी उपस्थित होते. आपण कुठल्या पक्षातून निवडणूक लढवणार की नाही ते व कुठल्या पक्षात दाखल होणार आहे ते लवकरच तुम्हा लोकांना सांगू असेही पत्रकारांना त्याने सांगितले. २०१७ च्या निवडणुकीमध्ये कॉंग्रेस कडे २१ आमदारांचं पाठबळ होतं व आपण त्या वेळी काँग्रेसच्या दिल्लीतील कायदा विभागाला विचारणा केल्यानंतर राज्यपालांना पत्र देण्याचे सांगितले. आपण पत्रही तयार केले होते मात्र गोव्यात असलेल्या काँग्रेसच्या निरीक्षकांनी आपणास राज्यपालांना पत्र देण्यास अडवले असे फालेरो यांनी सांगितले.

हे सांगण्यात साडेचार वर्षे का लागली? या प्रश्नाला मात्र त्यांनी उत्तर देण्याचे टाळले. आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात आपण कोकणीला राजभाषेचा दर्जा मिळवून दिला त्याच बरोबर गोव्याला राज्याचा दर्जा मिळून दिल्याचेही त्यांनी सांगितले.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मिसिंग लिंकवरील रक्ताच्या प्रकरणात नवा ट्विस्ट; खोपोली पोलिसात गोहत्या झाल्याची तक्रार

Maharashtra News Live Update: नागपूर जिल्ह्यातील धमणगावमधील विद्यामंदिरला भीषण आग

Nasarapur Case: नसरापूर प्रकरणावरून ग्रामस्थ आक्रमक, अडीच तासांपासून मुंबई- बंगळुरू महामार्ग पूर्णत: बंद; VIDEO

Crime News: भयंकर! पतीनं परदेशात दुसरीसोबत लग्न केलं; रागाच्या भरात पहिल्या पत्नीनं पोटच्या ४ मुलांना संपवलं

मोठी बातमी ! तरुण न्यायाधीशांनी आयुष्य संपवलं; बाथरूममध्ये आढळला मृतदेह

SCROLL FOR NEXT