भारतीय अंतराळ संस्थेने (ISRO) चंद्रावर पाठवलेले चांद्रयान-३ चे लँडर आणि रोव्हर मॉड्यूल पुन्हा एकदा सक्रिय करण्याची तयारी सुरू आहे. मात्र, हे लँडर आणि रोव्हर पुन्हा कार्यरत होतील, याची शक्यता खूपच कमी आहे. तरी देखील आज इस्त्रोतील शास्त्रज्ञ लँडर आणि रोव्हरला जागवण्याचा प्रयत्न करणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
भारताची अंतराळ मोहिम चांद्रयान-3 यशस्वी झाल्यानंतर लँडर आणि रोव्हरने तब्बल 14 दिवस चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास केला. या 14 दिवसात चंद्रावर रात्र झाली नव्हती. दरम्यान, 15 व्या दिवशी रात्र होताच लँडर आणि रोव्हर स्लीप मोडवर गेले. (Latest Marathi News)
आता तब्बल 14 दिवसांनी चंद्रावर पुन्हा सकाळ झाली आहे. त्यामुळे इस्त्रोकडून लँडर आणि रोव्हरला जागवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. लँडर आणि रोव्हर स्लीप मोडमधून उठून पुन्हा सक्रिय झाले, तर ही इस्रोसाठी आनंदाची बाब असेल.
चंद्रावर बुधवारचा दिवस खूपच थंड होता. त्यामुळे आज सूर्यप्रकाश वाढल्यानंतर लँडर आणि रोव्हरला जागवलं जाईल. याबाबत इस्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ग्राऊंड स्टेशन कमाल सूर्यप्रकाश उपलब्ध झाल्यानंतर गुरुवार किंवा शुक्रवारी लँडर, रोव्हर मॉड्युल आणि ऑनबोर्ड उपकरणांना पुनरुर्जीवित करण्याचा प्रयत्न करण्यात येईल.
इस्त्रो अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लँडर आणि रोव्हरमध्ये लावण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांना चंद्रावरील अतिथंड तापमानाचा सामना करण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आले नव्हते. ज्या ठिकाणी चांद्रयान-3 चे जिथे लँडिंग झालं आहे तिथे तापमान -२०० डिग्री सेल्सियसच्या खूप खाली जाते.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.