राज्यात हाडं गोठवणारी थंडी, उत्तरेतील शीत लहरींमुळे राज्यात थंडीची लाट

Cold Wave Intensifies: उत्तरेकडील शीत लहरींमुळे राज्यात हाडं गोठवणारी थंडी पडलीय..राज्यात कोणत्या जिल्ह्यात पारा घसरलाय? बदलत्या हवामानामुळे आरोग्यावर कसा परिणाम होतोय?
People warm themselves near a bonfire as Maharashtra reels under a severe cold wave with temperatures dropping below Mahabaleshwar in 17 cities.
People warm themselves near a bonfire as Maharashtra reels under a severe cold wave with temperatures dropping below Mahabaleshwar in 17 cities.Saam Tv
Published On

शेकोटी शेजारी बसलेले माणसांचे घोळके आणि पहाटे बोचऱ्या थंडीपासून बचाव करण्यासाठी कुडकुडत जाणारे हे लोक पाहिल्यानंतर राज्यात हाडं गोठवणाऱ्या थंडी आल्याचं दिसतंय...उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, आणि पंजाबमध्ये पारा सतत घसरतोय...तर दुसरीकडे केरळ, तामिळनाडू आणि अंदमान आणि निकोबार येथे मुसळधार पाऊस सुरु असल्यानं राज्यावर कोल्ड वेवचं संकट पसरलयं... राज्यातील 17 शहरं महाबळेश्वरपेक्षाही जास्त थंड असल्याचं पाहायला मिळतयं...

शहरं महाबळेश्वरपेक्षाही थंड

अहिल्यानगर 6.6

गोंदिया 8

नागपूर 8.1

नाशिक 8.2

नांदेड 8.8

मालेगाव 8.8

वर्धा 9.9

यवतमाळ 10

सातारा 10

अकोला 10

धाराशिव 10.2

गडचिरोली 10.2

अमरावती 10.2

परभणी 10.4

संभाजीनगर 10.8

चंद्रपूर 10.8

वाशिम 11.1

महाबळेश्वर 11.1

दुसरीकडे राज्यातील या क़डाक्य़ाच्या थंडीमुळे लहान मुलांनाही याचा फटका बसलाय... नाशिक महापालिकेने सकाळच्या सत्रात भरणाऱ्या शाळांचं वेळापत्रक बदलून 8 वाजता शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतलाय...तर दुसरीकडे थंडीमुळे नागपूरमध्ये सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण वाढलेत... विधानभवन परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्रमध्ये चार दिवसात 1 हजार रुग्णांची नोंद झाल्याची माहिती समोर आलीय...

उत्तरेकडील शीत लहरींमुळे पुढील 5 दिवसात कमाल तापमानात फार काही बदल होण्याची शक्यता नाही. त्यामुळे थंडीत घराबाहेर पडताना स्वेटर, मफलर घालूनच घराबाहेर पडा....अन्यथा थंडी तुमच्या आरोग्यासाठी मारक ठरू शकते, हे विसरू नका...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com