MP found dead in Kolkata  Saam tv
देश विदेश

MP found dead in Kolkata : बांगलादेशातील खासदार कोलकात्यामधील घरात मृतावस्थेत आढळले; अनेक दिवसांपासून होते बेपत्ता

bangladesh MP found dead in Kolkata : बांगलादेशातील गृहमंत्र्यांनी त्यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. बांगलादेशातील खासदार अनवारुल हे गेल्या काही दिवसांपूर्वी उपचारासाठी भारतात आले होते.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : बांगलादेशातील सत्ताधारी पक्षातील खासदार अनवारुल अजीन अनार हे कोलकात्यामधील एका घरात मृतावस्थेत आढळले. बांगलादेशातील गृहमंत्र्यांनी त्यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. बांगलादेशातील खासदार अनवारुल हे गेल्या काही दिवसांपूर्वी उपचारासाठी भारतात आले होते. ते गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होते. त्यामुळे भारतातील पोलीस देखील त्यांच्या शोध मोहिमेवर होते.

बांगलादेशातील गृहमंत्री असुदुज्जमा खान यांनी सांगितलं की, कोलकाता पोलिसांनी त्यांच्या मृत्यूबाबत माहिती दिली. पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बांगलादेशातील खासदार अनवारुल हे एका फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळले. ते बांगलादेशामधून भारतात एका व्यक्तीला भेटण्यासाठी गेले होते.

खासदार अजीम हे १२ मे रोजी कोलकाताला पोहोचले होते. त्यानंतर अजीम यांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क होत नव्हता. त्यांचा मोबाईल १४ मे रोजीपासून स्विच ऑफ होता.

उत्तर कोलकातामधील बर्नानगर पोलीस स्टेशनच्या जनरल डायरीमध्ये १८ मे रोजी बांग्लादेशचे खासदार बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली. सूत्रांच्या माहितीनुसार, अजीम हे १२ मे रोजी सांयकाळी सात वाजता त्यांचे मित्र गोपाल विश्वास यांच्या घरी गेले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी १.४१ वाजता डॉक्टरांना भेटायला गेले. त्यावेळी मित्राला पुन्हा येतो, असं सांगून गेले.

अनवारुल हे विधान पार्कातील कोलकाता पब्लिक शाळेसमोरून टॅक्सी केली. त्यानंतर मित्र गोपाल यांना दिल्लीला जात असल्याचे व्हॉट्सअॅप मेसेज करून सांगितले. तसेच तेथे पोहोचून कॉल करेल असे सांगितलं.

अनवारुल यांनी १४ मे रोजी गोपाल यांना आणखी एक मेसेज केला. त्या मेसेजमध्ये दिल्लीला पोहोचल्याचे सांगितले. त्यावेळी त्यांनी कॉल करायची गरज नसल्याचे सांगितले. तोच मेसेज त्यांनी पीए राऊफ यांनाही पाठवला. त्यानंतर १७ मे रोजी त्यांच्या मुलीने गोपाल यांना कॉल करत सांगितलं की, वडिलांचा फोन लागत नाही, त्या दिवसांपासून खासदार अनवारुल हे कोणाच्याही संपर्कात नसल्याची माहिती मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: अजित पवार १५ हजार मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: सुरुवातीच्या कलात काँग्रेसचे 'हे' तीन दिग्गज नेते पिछाडीवर

बिग बॉस फेम अभिनेत्रीचं सौंदर्य, पाहून काळजाचा ठोका चुकला

South Indian Star : दाक्षिणात्य कलाकारांना मुंबईची भुरळ, रश्मिका मंदानासह 'या' सेलिब्रिटींनी घेतले आलिशान फ्लॅट

Maharashtra Election Results : बाळासाहेब थोरात, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार पिछाडीवर, टॉप १० मतदारसंघातल्या लढतीत काय स्थिती

SCROLL FOR NEXT