देश विदेश

चमत्कारच! मृतदेह चितेवर ठेवला, अग्नी देण्यापूर्वीच महिलेनं केलं असं काही, सगळे हादरले!

How did woman declared dead come alive again in Odisha? पुरी, ओडिशा येथे घडलेली ही घटना सगळ्यांना थक्क करणारी आहे. ८६ वर्षीय महिलेला मृत समजून चितेवर ठेवण्यात आले होते. अग्नी देण्यापूर्वीच ती पुन्हा श्वास घेऊ लागली. कुटुंबीय आणि उपस्थित लोकांना हादरा बसला. सध्या महिलेची प्रकृती स्थिर आहे.

Namdeo Kumbhar

  • ओडिशातील पुरी शहरात दुर्मिळ व चमत्कारिक घटना घडली.

  • मृत घोषित केलेली ८६ वर्षीय महिला चितेवर जिवंत झाली.

  • अग्नी देण्यापूर्वी ती पुन्हा श्वास घेऊ लागली.

  • महिला सध्या रुग्णालयात उपचार घेत असून प्रकृती स्थिर आहे.

Woman declared dead alive before cremation in Odisha : ओडिशातील पुरी शहरातून एक धक्कादायक आणि चमत्कारिक घटना समोर आली आहे. मृत समजून एका महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात येत होती. घरात दुखाचे वातावरण होते. अंत्यसंस्काराची सर्व तयारी झाली. मृतदेह चितेवर ठेवण्यात आला. अग्नि देण्याआधीच ती महिला जिवंत झाली. या प्रकारामुळे सगळ्यांना थक्क करून सोडलं. पोलसरा गावातील ८६ वर्षीय पी. लक्ष्मी गेल्या काही दिवसांपासून आजारी होती. १५ तारखेला लक्ष्मीकडून कोणताही प्रतिसाद आला नाही. तिच्या कुटुंबाने तिला मृत समजलं आणि अंत्यसंस्कारासाठी पुरीला आणलं. डॉक्टरांनीही तिचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं होतं. कुटुंबाने अॅम्ब्युलन्सद्वारे तिचा मृतदेह पुरीच्या स्वर्गद्वार स्मशानात नेला. पण अग्नि देण्याआधी ती जिवंत असल्याचे सर्वांच्या लक्षात आले.

८६ वर्षांच्या पी. लक्ष्मी या मुळच्या आंध्र प्रदेशमधील राहणार्‍या आहेत. त्या आपल्या लेकीकडे ओडिशामधील गंजाम जिल्ह्यातील पोलासरा येथे आल्या होत्या. १४ तारखेला रात्री त्या झोपल्या, पण सकाळी त्यांचा श्वास बंद झाल्याचे कुटुंबियांना लक्षात आले. त्यांनी तात्काळ रूग्णालय गाठलं. डॉक्टरांनीही लक्ष्मी यांना मृत घोषित केले. कुटुंबियांकडून अंत्यसंस्काराची तयारी सुरू करण्यात आली. त्यांनी मृतदेह पुरीमधील स्मशानात आणला. रिती रिवाजा प्रमाणे त्यांच्यावर अंत्यसंस्कार कऱण्यात येणार होते. त्यांचा मृतदेह चितेवर ठेवला, अग्नी देण्यात येणार होती. तेवढ्यातच त्यांच्या शरीरात पुन्हा प्राण आले अन् श्वास सुरू झाला. या घटनेनंतर स्मशनातील सर्वांनाच धक्का बसला.

तिची श्वासन प्रक्रिया थांबली होती. त्यामुळे आम्हाला त्या मृत झाल्याचे वाटलं. डॉक्टरांच्या तपासणीनंतर मृतदेह घेऊन आम्ही पुराला आलो. अंत्यसंस्कार करण्याआधीच लक्ष्मीच्या छातीची हालचाल पाहिली. ती पुन्हा श्वास घेत होती. तिला ताबडतोब जवळच्या पुरी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. डॉक्टकरांनी तात्काळ तपासणी केली अन् जिवंत असल्याचे सांगितले. सध्या तिची स्थिती स्थिर आहे, असे लक्ष्मीच्या मुलीने सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sai Tamhankar: लालछडी...! सईचा हटके अंदाज, Photo पाहतच राहाल

Actress Vannu The Great : लग्नासाठी धर्मांतर केलं, नवरा संसार अर्ध्यात सोडून पळाला; अभिनेत्री रडून रडून बेहाल

Crime News : जमिनीच्या वादातून अपहरण करत हत्या; शहापूर तालुक्यातील घटनेने खळबळ

Prajakta Koli: सोशल मिडीया स्टार प्राजक्ता कोळीची मराठीत एन्ट्री; 'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम'मध्ये साकारणार खास भूमिका

Maharashtra Live News Update: सरकारने काढलेला जीआर वादग्रस्त - छगन भुजबळ

SCROLL FOR NEXT