Minority Scholarship Scam Saam Tv
देश विदेश

Minority Scholarship Scam: केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालयाच्या शिष्यवृत्ती योजनेत 144 कोटींचा घोटाळा, स्मृती इराणींनी दिले चौकशीचे आदेश

Scholarship Scam: केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालयाच्या शिष्यवृत्ती योजनेत 144 कोटींचा घोटाळा, स्मृती इराणींनी दिले चौकशीचे आदेश

साम टिव्ही ब्युरो

Minority Scholarship Scam: देशातील अल्पसंख्याक संस्थांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीत 144 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याची बातमी समोर येत आहे. केंद्र सरकारच्या तपासात ही बाब समोर आली आहे.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मदरशांसह 1572 अल्पसंख्याक संस्थांच्या तपासणीत 830 संस्था बनावट आढळून आल्या असून, यामध्ये 144 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे.

कोट्यवधींचा घोटाळा

अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाच्या वतीने मदरसा आणि इतर अल्पसंख्याक संस्थांमध्ये शिकणाऱ्या मुलांना 4,000 ते 25,000 रुपयांपर्यंतची वार्षिक शिष्यवृत्ती दिली जाते. (Latest Marathi News)

मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 2007 ते 2022 पर्यंत त्यांनी या योजनेअंतर्गत 22,000 कोटी रुपयांची शिष्यवृत्ती दिली आहे. आता तपासात अनेक बनावट संस्था आणि शिष्यवृत्तीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे.

अधिकारीही निघाले बनावट

काही राज्यांकडून तक्रारी आल्यानंतर, केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालयाने NCAER द्वारे याची तपासणी केली. यात 1572 पैकी 830 संस्था बनावट असल्याचे आढळून आले. म्हणजे 53 टक्के संस्था बनावट होत्या. या संस्थांचे 229 अधिकारी, अगदी नोडल आणि जिल्हा अधिकारीही बनावट निघाले.

यामध्ये छत्तीसगडमध्ये 62, राजस्थानमध्ये 99, आसाममध्ये 68, कर्नाटकमध्ये 64, उत्तराखंडमध्ये 60, मध्य प्रदेशमध्ये 40, बंगालमध्ये 39, उत्तर प्रदेशमध्ये 44 बनावट अधिकारी सापडले आहेत. सध्या या घोटाळ्याचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. सर्वातआधी 2020 मध्ये आसामच्या अल्पसंख्याक मंडळाने राज्यात या प्रकरणाचा खुलासा केला होता आणि केंद्रीय मंत्रालयालाही त्याबद्दल माहिती देण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Garden: बगीचा सुंदर दिसण्यासाठी तुमच्या बागेत लावा ही ५ झाडे

Nashik News : नाशिकमध्ये मनसेला मोठा धक्का; माजी महापौर करणार ठाकरे गटात प्रवेश

Winter Fashion Tips :हिवाळ्यात Cool अन् Cozy लूक हवाय? 'या' फॅशन टिप्स फॉलो करा, प्रत्येकजण तुम्हाला पाहून वेडा होईल

satyanarayan vrat 2024: सत्यनारायणाची पूजा करायचीय? या महिन्यातील हा दिवस शुभ, जाणून घ्या मुहूर्त आणि विधी

Kanguva Movie Review: दमदार ॲक्शनवाला सूर्या आणि बॅाबी देओलचा 'कांगुवा ' प्रदर्शित, प्रेक्षकांना कसा वाटला चित्रपट जाणून घ्या

SCROLL FOR NEXT