haridwar news Saam tv
देश विदेश

Shocking : अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; नराधमांनी कृत्यानंतर कौर्याची सीमाच ओलांडली, शहरात खळबळ

Shocking news : हरिद्वारमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. नराधमांनी केलेल्या कृत्यानंतर शहरात खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

उत्तराखंडच्या हरिद्वार जिल्ह्यातील रुडकीमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. लहान मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्यानंतर तिला छतावरून फेकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेतील पीडित मुलीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. हरिद्वारच्या पथरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. अत्याचाराच्या घटनेनंतर गावकऱ्यांकडून संताप व्यक्त होत आहे.

सामूहिक अत्याचारानंतर मुलीला छतावरून फेकून देण्यात आलं. त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या मुलीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. गावकऱ्यांनी आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे.

गौशाळाजवळील एका बंद खोलीत तिघांनी १४ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार केला.स्थानिकांनी घराचा दरवाजा उघडण्यासाठी प्रयत्न केला. त्यानंतर आरोपींनी मुलीला छतावरून फेकून दिलं. रुग्णालयात दाखल केलेल्या मुलीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.

मुलीवरील सामूहिक अत्याचाराच्या घटनेनंतर गावकऱ्यांनी पोलीस स्टेशनला घेराव घालून आंदोलन केलं. पथरी पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी एफआयआर नोंदवून आरोपींचा शोध सुरु केला आहे. पीडित मुलीच्या नातेवाईकांनी जबाब नोंदवताना म्हटलं की, अल्पवयीन मुलीला फूस लावून शेतातील खोलीत नेलं. या खोलीत दोन जण आधीपासून होते.

खोलीतील तिन्ही आरोपींनी मुलीवर अत्याचार केला. मुलीला खोलीत घेऊन जाताना काही लोकांनी पाहिलं. दोघे जण घराच्या मागच्या दरवाजाने गेले. गावातील लोकांनी घराचा दरवाजा ठोठावला. त्यानंतर आरोपींनी मुलीला छतावरून फेकून देत घटनास्थळावरून फरार झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Plastic Stool: स्टूलमध्ये छोटे छिद्र का असते? डिझाईन समजण्याची करू नका चूक!

Maharashtra Live News Update : राज्यात आज शिवजंयतीचा उत्साह

चिमुरडीच्या डोक्यात अडकलं भांडं, दीड इंचावर फिरत होता मृत्यू

Horoscope: आत्मविश्वास वाढेल मनातील भावना येतील ओठांवर; धनलाभ होण्याची शक्यता, जाणून घ्या आजच तुमचं भविष्य

Wildcat: मांजर कोणत्या बाजूने आडवी गेली तर काय करावं?

SCROLL FOR NEXT