धक्कादायक! घरात घुसून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
धक्कादायक! घरात घुसून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार Saam Tv
देश विदेश

धक्कादायक! घरात घुसून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : एका अल्पवयीन मुलीवर चौघांनी मिळून सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. हरियाणा मधील सोनीपत Sonipat या जिल्ह्यामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. सोनीपत जिल्ह्यात सदर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत असलेल्या गावात चौघांनी हे घृणास्पद कृत्य केले आहे.

या घटनेप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आपली कारवाई सुरू केली आहे. सोनीपत जिल्ह्यामधील सदर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या गावात ४ जणांनी मिळून मुलीच्या घरात शिरले. त्यानंतर या चौघांनी पीडित अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आहे.

हे देखील पहा-

या घटनेबाबत कुणाला देखील सांगितले तर तुला जीवे मारू, अशी धमकी देखील आरोपींनी दिली आणि यानंतर घटनास्थळावरुन आरोपींनी पळता पाय काढला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. चारही आरोपींना अटक करण्याकरिता पोलिसांनी २ टीम तयार केले आहेत. पोलिसांच्या या २ टीममध्ये आसपासच्या परिसरामध्ये छापेमारी करत आरोपींचा शोध घेत आहेत.

तसेच खबऱ्यांच्या माध्यमातून देखील पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. या घटनेची माहिती देताना सदर पोलीस ठाण्याचे पोलीस प्रबारी दिलबाग सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार की, एका अल्पवयीन मुलीच्या घरात शिरुन चौघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आहे. चारही आरोपींना पकडण्याकरिता प्रयत्न सुरू आहेत. अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली आहे आणि तिचा जबाब नोंदवण्यात आला आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: बारामतीसह ११ लोकसभा मतदारसंघात आज होणार मतदान; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

Horoscope Today: व्यवहारात सतर्कता बाळगा, सावधगिरीने काम करा; जाणून घ्या तुमचे राशिभविष्य

Rashi Bhavishya: मंगळवार तुमच्यासाठी काय घेऊन आलाय? वाचा राशिभविष्य

Supreme Court: ...तर मानधन सोडा, घशाला आराम द्या; रोहतगींच्या त्या विनंतीवर CJI चंद्रचूड यांचं उत्तर

Pune Crime: कात्रज,स्वारगेट परिसरात दोन जणांचा खून; शिवीगाळ केल्याच्या वादातून एकाने डोक्यात घातला दगड

SCROLL FOR NEXT