सासूनं जावयाची हातोड्याने वार करत निर्घृण हत्या: कारण ऐकाल तर व्हाल थक्क

एका महिलेने आपल्या जावयाची हातोड्याने वार करत निर्घृण हत्या करण्यात आली आहे.
सासूनं जावयाची हातोड्याने वार करत निर्घृण हत्या: कारण ऐकाल तर व्हाल थक्क
सासूनं जावयाची हातोड्याने वार करत निर्घृण हत्या: कारण ऐकाल तर व्हाल थक्क Saam Tv

मुंबई : मुंबई मधील वडाळा पूर्व परिसरात एक विचित्रच घटना घडली आहे. या ठिकाणी एक महिलेने आपल्या जावयाची हातोड्याने वार करत निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना उघडकीस येताच परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती वडाळा टीटी पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

५६ वर्षीय जावयाला रक्ताच्या थारोळ्यात पडलेले बघून पोलीस देखील हादरून गेले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी मृताच्या सासूविरोधामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिला बेड्या ठोकले आहेत. या घटनेचा पुढील अधिक तपास पोलीस करत आहेत. विमल खन्ना असे हत्या करण्यात आलेल्या ५६ वर्षीय जावयाचे नाव आहे. ते मुंबईमधील वडाळा पूर्व परिसरामधील रहिवासी आहेत. तर शांती पाल असे अटक करण्यात आलेल्या ७२ वर्षीय महिलेचे नाव आहे.

हे देखील पहा-

ती विरारमधील रहिवासी आहे. आरोपी महिला काही दिवसाअगोदर आपला जावई विमल खन्ना यांच्याकडे राहण्याकरिता आली होती. दरम्यान, दोघांमधील जुना वाद मोठ्या प्रमाणात उफळल्याने ७२ वर्षीय महिलेने आपल्या जावयाची निर्घृण हत्या केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे.

५६ वर्षीय मृत विमल खन्ना यांनी काही वर्षांअगोदर आपल्या वयापेक्षा १६ वर्षांनी मोठ्या असणाऱ्या शांती पाल यांना लग्नाकरिता मागणी घातली होती. पण खन्ना यांनी पाल यांच्याशी लग्न न करता त्यांच्या मुलीशी लग्न केले आहे. यामुळे विमल खन्ना आणि शांती पाल यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाद सुरू होता. एकेकाळी लग्नाकरिता मागणी घालणारा मुलगाच आपला जावई बनल्यामुळे शांती पाल यांना विमल खन्ना यांच्यावर प्रचंड राग होता.

सासूनं जावयाची हातोड्याने वार करत निर्घृण हत्या: कारण ऐकाल तर व्हाल थक्क
मोठी बातमी! एबी डिव्हिलियर्सची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

यामधून दोघांमध्ये अनेकदा भांडणं देखील झाली होती. पण काही दिवसांअगोदर ७२ वर्षीय शांती पाल आपला जावई खन्ना यांच्याकडे वडाळा याठिकाणी आले होते. दरम्यान मंगळवारी दोघांमधील जुना वाद परत एकदा उफाळून निघाला होता. याच रागामधून ७२ वर्षीय सासूबाई शांती पाल यांनी विमल खन्ना यांच्या डोक्यात हातोड्याने वार करत त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

या घटनेची माहिती वडाळा टीटी पोलिसांना मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. घटनास्थळाचा पंचनामा केल्यावर पोलिसांनी आरोपी सासूबाई विरोधामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करत तिला अटक करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील अधिक तपास वडाळा पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com