Forest officials inspect the spot where a leopard was killed during a midnight struggle with a youth in Odisha Saam Tv
देश विदेश

तरुण गाढ झोपेत होता, दबक्या पावलाने नरभक्षक बिबट्या घरात शिरला, त्यानंतरचा थरार वाचून काळजाचा ठोका चुकेल

Leopard Attacks Youth While Sleeping At Night In Odisha: नरसिंहपूर येथे मध्यरात्री घरात घुसून बिबट्याने तरुणावर हल्ला केला. जीव वाचवण्यासाठी तरुणाने बिबट्याशी झुंज देत त्याला ठार मारले.

Omkar Sonawane

राज्यासह देशभरात बिबट्याने दहशत माजवली आहे. मंचर, अहिल्यानगरसह राज्यात बिबट्याने धुमाकूळ घातला असून यामध्ये आतापर्यंत शेकडो जणांचा मृत्यू झाला आहे. अक्षरशः बिबट्याने कित्येक लोकांना फाडून टाकले आहे. यामुळे काहीकाळ राज्याचे राजकारण देखील तापले होते. मंचरमध्ये महिला रात्री बाहेर देखील पडत नाहीये तर आपल्या मानेभोवती खिळयांचे आवरण घालून स्वतःच संरक्षण करत आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे येथील मुलांचे लग्न देखील जमत नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले होते.

अशातच ओडिसामध्ये एका तरुणाने बिबट्याचाच खात्मा केला आहे. ओडिसा राज्यातील कटक जिल्ह्यामध्ये नरसिंहपूरमध्ये शुक्रवारच्या मध्यरात्री एक खळबळ उडवून देणारी घटना घडली. या गावामध्ये बिबट्या आणि एका तरुणाची समोरासमोर चकमक झाली आणि चकमकीत बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. तरुण देखील गंभीररित्या जखमी झाला आहे.

साखर झोपेत असताना केला हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार, गावातील एक तरुण घरामध्ये गाढ झोपलेला होता. त्यावेळी अचानक बिबट्या घरात शिरला आणि त्या हल्लावर केला. अचानक झालेल्या हल्ल्याने घरात मोठी खळबळ उडाली. त्या तरुणाने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी मोठे धाडस केले आणि बिबट्यासोबत दोन हात करू लागला. दोघांमध्ये बराचवेळ जोरदार हल्ले प्रतिहल्ले सुरू होते. या दरम्यान तरुणाने त्याला ठार मारले. यामध्ये बिबट्याचा जागीच मृत्यू झाला.

तरुण गंभीर जखमी

या हाणामारीत त्या तरुणाच्या शरीराच्या अनेक भागांना गंभीर दुखापत झाली. रक्ताने माखलेल्या या तरुणाला तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला रात्री कटकमधील एका मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. जखमी व्यक्तीचे नाव समर भोळ असे आहे. त्याची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरू आहे.

वन विभागाकडून गावकऱ्यांना आवाहन

घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले. वन विभागाने मृत बिबट्याला ताब्यात घेतलं आहे आणि तपास सुरू केला आहे. बिबट्या गावात कुठून आला आणि घटनेच्या आजूबाजूच्या भागांचा सखोल तपास सुरू आहे. या घटनेनंतर गावात दहशतीचे वातावरण पसरले आहे. गावकरी प्रचंड घाबरले असून घराबाहेर पडण्यास देखील ते घाबरत आहे. वन विभागाने जनतेला रात्री सतर्क राहण्याचे आणि सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Tourism : शहराच्या गजबजाटापासून दूर 'या' ठिकणी घ्या निवांत विश्रांती, कल्याणजवळील निसर्गरम्य पर्यटन स्थळ

ऐन जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत खळबळ; काँग्रेसच्या महिला उमेदवाराचे अपहरण?

Jio Recharge Plan: फक्त 198 रुपयांत 28GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग; Jio चा स्वस्त प्लॅन

Maharashtra Live News Update: तांबाळा जिल्हा परिषद गटातील काँग्रेस उमेदवार यांचा अपहरण झाल्याचा संशय

माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, अभिनेते धर्मेंद्र यांना पद्मविभूषण; १३१ जण पद्म पुरस्काराने सन्मानित,वाचा संपूर्ण यादी

SCROLL FOR NEXT