Russian President Vladimir Putin reacts strongly amid escalating Iran–US–Israel conflict and Indian Ocean naval incident. saam tv
देश विदेश

Iran-US War: जगात तिसरं महायुद्ध पेटलं! खामेनेईंच्या मृत्यूवरून व्लादिमीर पुतीन यांचा अमेरिकेला गंभीर इशारा

Russia Warn Third World War To America: रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी इराणमधील राजवट बदलाविरुद्ध अमेरिकेला इशारा दिला आहे. अशा कृतींमुळे तिसरे महायुद्ध सुरू होऊ शकते असा इशारा रशियाकडून देण्यात आलाय.

Bharat Jadhav

  • व्लादिमीर पुतीन यांचा अमेरिकेला तिसऱ्या महायुद्धाचा इशारा.

  • इराणमध्ये राजवट बदलण्याच्या प्रयत्नांवर रशियाची तीव्र प्रतिक्रिया.

  • अमेरिकेचा दावा – इराणी फ्रिगेट “आयआरआयएस डेना” हिंदी महासागरात बुडवले.

इस्रायल -अमेरिका आणि इराणच्या युद्धात आता रशियानं उडी घेतली असून त्यांनी थेट तिसरं महायुद्धासाठी तयार असा इशारा दिलाय. गुन्हेगारी पद्धतीने राजकीय राजवट बदलण्याचा वेडेपणा असून अशा पद्धतीने राजवट बदलल्यास तिसर महायुद्ध सुरू होऊ शकतं असा इशारा व्लादिमीर पुतीन यांनी अमेरिकेला दिला आहे.

दुसरीकडे अमेरिकेने एक मोठा दावा केला की, श्रीलंकेच्या दक्षिण किनाऱ्यावरील हिंद महासागरात अमेरिकेच्या नौदलाच्या हल्ल्याच्या पाणबुडीने इराणी नौदलाचे मॉडज-क्लास फ्रिगेट "आयआरआयएस डेना"ला टॉरपीडोने समुद्रात बुडावले आहे. अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी पेंटागॉन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत हा दावा केला आहे. त्याआधी श्रीलंकेच्या परराष्ट्र मंत्री विजिता हेराथ यांनी संसदेत माहिती दिली की, इराणी जहाजाकडून संकटाचा फोन आल्यानंतर श्रीलंकेच्या नौदल आणि हवाई दलाने तात्काळ बचाव कार्य सुरू केले. जहाजावरील अंदाजे १८० खलाशांपैकी ३२ हून अधिक खलाशांना वाचवण्यात आले.

त्यानंतर आता रशियाने तिसऱ्या महायुद्धाचा इशारा दिलाय. अमेरिकेनं जर राजकीय राजवट बदलण्याचं धोरण थांबवले नाही. आपली आक्रमकता कमी केली नाही तर तिसरं महायुद्ध सुरू होईल, असाच इशारा व्लादिमीर पुतीन, यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना दिलाय. गुन्हेगारी पद्धतीने राजकीय राजवट बदलण्याचा वेडेपणा असून अशा पद्धतीने राजवट बदलल्यास तिसर महायुद्ध सुरू होऊ शकतं असा इशारा पुतीन यांनी अमेरिकेला दिला आहे. अली हुसैनी खामेनेईंचा मृत्यू ही क्रूर हत्या असेही पुतीन इशारा देताना म्हणालेत.

खामेनेईंचा यांची हत्या ही क्रूर स्वरूपाची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे पुतीन यांनी स्पष्टपणे अमेरिकेला इशारा दिला आहे. जर अमेरिकेन आपली आक्रमकता ही कमी केली नाही तर पुढच्या काळात तिसऱ्या महायुद्धाचा प्रकार समोर येईल आणि रशिया चीन हे एकत्रितपणे या युद्धामध्ये उतरताना आपल्याला पाहायला मिळू शकतील आणि त्यातून आता आपण तिसऱ्या महायु युद्धाच्या तोंडावर उभे आहोत, अशी स्वरूपाचे चित्र आहे.

याआधीही रशियाने अमेरिकेला इशारा दिला होता. रशियन परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले होतं की, वॉशिंग्टन आणि तेल अवीव यांनी पुन्हा एकदा धोकादायक मार्गावर पाऊल ठेवले आहे. जे मानवतावादी, आर्थिक आणि कदाचित रेडिओलॉजिकल आपत्तीकडे वेगाने ढकलत आहे. हल्लेखोरांचे हेतू स्पष्ट आणि उघड आहेत. संवैधानिक व्यवस्था नष्ट करणे, ज्या देशाने सत्ता आणि वर्चस्वाच्या दबावापुढे झुकण्यास नकार दिला आहे, त्या देशाचे नेतृत्व काढून टाकण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवसेना शिष्टमंडळाची महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

SCROLL FOR NEXT