Wreckage of the MI-17 helicopter that crashed during a Pakistan flood relief mission, killing 5 people  social media/X
देश विदेश

Helicopter crash : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गेलेलं हेलिकॉप्टर कोसळलं, २ पायलटसह ५ जणांचा मृत्यू

MI-17 helicopter crash during Pakistan flood rescue : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गेलेलं हेलिकॉप्टर कोसळलं. या दुर्घटनेत दोन पायलटसह पाच जणांचा मृत्यू झाला. पाकिस्तानमधील खैबर पख्तुनख्वामध्ये ही दुर्घटना घडली.

Nandkumar Joshi

पुराचं रौद्ररूप अनुभवणाऱ्या वायव्य पाकिस्तानमध्ये भयंकर दुर्घटना घडली. मुसळधार पावसामुळं आलेल्या पुराचा तडाखा बसलेल्या लोकांच्या मदतीसाठी जीवनावश्यक वस्तू घेऊन जाणारे सरकारचं हेलिकॉप्टर कोसळलं. यात दोन पायलटसह पाच जणांचा मृत्यू झाला. पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात ही दुर्घटना घडली. पूरग्रस्त भागात लोकांच्या मदतीसाठी आवश्यक वस्तू घेऊन जाणारे हेलिकॉप्टर खराब हवामानामुळं कोसळलं. यात दोन पायलट आणि अन्य तिघे जण मृत्युमुखी पडले.

खराब हवामानामुळं हेलिकॉप्टर कोसळले (Khyber Pakhtunkhwa helicopter crash kills pilots and crew)

प्राथमिक माहितीनुसार, खैबर पख्तुनख्वा सरकारच्या एमआय-१७ हेलिकॉप्टरनं पेशावरहून बाजौरच्या दिशेनं उड्डाण केलं होतं. त्यावेळी मोहमंद कबायली जिल्ह्यानजीक हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला. खराब हवामानामुळं ते कोसळलं. खैबर पख्तुनख्वाचे मुख्य सचिव शहाब अली शाह यांनी या घटनेला दुजोरा दिला असून, खराब हवामानामुळंच ही दुर्घटना घडली, असं त्यांनी सांगितलं.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हेलिकॉप्टर कोसळून दोन पायलट आणि अन्य तिघांचा मृत्यू झाला आहे. खराब हवामानामुळे ते कोसळलं की अन्य कोणते कारण होते, याची चौकशी अजून व्हायची आहे. बचाव पथके घटनास्थळी रवाना करण्यात आली आहेत. मृतांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

पुरामुळं १०० हून अधिक जणांचा मृत्यू

रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वामध्ये मुसळधार पाऊस कोसळत असून, पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना देखील घडल्या आहेत. आतापर्यंत १०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये जखमी झाले आहेत. तर काही जण बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

मुख्यमंत्र्यांचा शोकसंदेश

खैबर पख्तुनख्वाचे मुख्यमंत्री अली अमीन गंदापूर यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला. शनिवारी संपूर्ण प्रांतात एक दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. आम्ही मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत. हेलिकॉप्टरमधील क्रू मेंबरने इतरांचे जीव वाचवण्यासाठी स्वतःचं बलिदान दिलं. ते आमचे खरे हिरो आहेत, त्यांचे बलिदान नेहमी स्मरणात राहील, असंही मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mhada Flat : 'म्हाडाचे घर' सर्वसामान्यांसाठी 'लुटीचा अड्डा'? कुणी केला गंभीर आरोप, वाचा

L Ganesan death : मृत्यूशी झुंज अपयशी ठरली; राज्यपाल एल. गणेशन यांचं निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

Woman Threatening: 'तुझे कपडे उतरवून तुला...';पिंक टी-शर्टवाल्या बाईचा भररस्त्यात राडा,व्हिडिओ व्हायरल

Meat Ban Row : दाबा लोकशाहीचं बटन, दाबून खा मच्छी मटण

Human Washing Machine : आता वॉशिंग मशिन माणुसही धुणार; 15 मिनिटांत तुम्ही व्हाल ताजेतवाने, वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT