Helicopter Crash: उड्डाण घेताच काही मिनिटांत हेलिकॉप्टर कोसळलं, संरक्षण मंत्र्यांसह ८ जणांचा मृत्यू

Ghana Helicopter Crashed: अफ्रिकेच्या घानामध्ये हेलिकॉप्टर कोसळून ८ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये देशाचे संरक्षमंत्री आणि पर्यावरण मंत्र्यांचा समावेश आहे. या अपघाताचे अनेक फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत.
Helicopter Crash: उड्डाण घेताच काही मिनिटांत हेलिकॉप्टर कोसळलं, संरक्षण मंत्र्यांसह ८ जणांचा मृत्यू
Helicopter CrashSaam Tv
Published On

Summary -

  • घानामध्ये उड्डाणानंतर काही मिनिटांतच हेलिकॉप्टर कोसळल्याने ८ जणांचा मृत्यू.

  • मृतांमध्ये घानाचे संरक्षण आणि पर्यावरण मंत्री यांचा समावेश.

  • अपघातानंतर हेलिकॉप्टरला आग लागली. त्यामुळे सर्वांचा होरपळून मृत्यू.

  • घानाच्या सरकारने या घटनेला राष्ट्रीय शोकांतिका म्हणून घोषित केले.

आफ्रिकेच्या घानामध्ये हेलिकॉप्टरला मोठा अपघात झाला. संरक्षणमंत्री आणि पर्यावरण मंत्र्यांसह ८ जणांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर कोसळलं. या अपघातामध्ये हेलिकॉप्टरमधील सर्वच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हे हेलिकॉप्टर उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांमध्येच कोसळलं. राजधानी अक्रापासून ओबुआसीमधून या हेलिकॉप्टरने उड्डाण घेतलं होतं. या हेलिकॉप्टरचा रडारशी संपर्क तुटला आणि ते कोसळलं. हे हेलिकॉप्टर अंदासी भागात कोसळल्याचे सांगितले जात आहे.

घाना येथे झालेल्या हेलिकॉप्टर अपघातानंतर लष्कराने चौकशीचे आदेश दिले आहेत. या हेलिकॉप्टर अपघातात संरक्षण मंत्री एडवर्ड ओमान बोआमाह आणि पर्यावरण मंत्री इब्राहिम मुर्तला मोहम्मद यांच्यासह ८ जणांचा मृत्यू झाला. या अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांमध्ये सत्ताधारी पक्ष नॅशनल डेमोक्रेटिक काँग्रेसचे उपाध्यक्ष, एक वरिष्ठ राष्ट्रीय सल्लागार आणि क्रू सदस्यांचा देखील समावेश आहे.

Helicopter Crash: उड्डाण घेताच काही मिनिटांत हेलिकॉप्टर कोसळलं, संरक्षण मंत्र्यांसह ८ जणांचा मृत्यू
Air India Plane Crash: एअर इंडियाचे संतापजनक कृत्य! ब्रिटनमध्ये मृतदेहांची अदलाबदली, कुटुंबीय संतप्त

घानाच्या सरकारने या अपघाताचे वर्णन राष्ट्रीय शोकांतिका म्हणून केले आहे. घाना सरकारने शोक व्यक्त करताना ही दुर्घटना देशासाठी मोठा धक्का असल्याचे म्हटले आहे. या अपघातात संरक्षण आणि पर्यावरण मंत्र्यासह घानाचे कार्यवाहक उप-राष्ट्रीय सुरक्षा समन्वयक अल्हाजी मोहम्मद मुनिरू लिमुना, राष्ट्रीय लोकशाही काँग्रेसचे उपाध्यक्ष सॅम्युअल सारपोंग आणि माजी संसदीय उमेदवार सॅम्युअल अबोआगे यांचाही मृत्यू झाला.

Helicopter Crash: उड्डाण घेताच काही मिनिटांत हेलिकॉप्टर कोसळलं, संरक्षण मंत्र्यांसह ८ जणांचा मृत्यू
Plane Crash: गेल्या ७ महिन्यांत विमान अपघातातील मृत्यूची आकडेवारी धक्कादायक; कुठे आणि कधी घडल्या दुर्घटना? वाचा

या हेलिकॉप्टरमध्ये एकूण पाच प्रवासी आणि तीन क्रू मेंबर्स होते. घानाच्या लष्कराने सांगितले की, हेलिकॉप्टरने सकाळी ९.१२ वाजता राजधानी अक्रा येथून उड्डाण केले होते. ते सोन्याच्या खाणी असलेल्या ओबुआसी शहराकडे जात होते. जिथे एक राष्ट्रीय कार्यक्रम होणार होता. यादरम्यान अचानक या हेलिकॉप्टरचा रडारसोबत संपर्क तुटला. त्यानंतर काही मिनिटांमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं. कोसळल्यानंतर हेलिकॉप्टरने पेट घेतला यामध्ये आठही जणांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेचे अनेक फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत.

Helicopter Crash: उड्डाण घेताच काही मिनिटांत हेलिकॉप्टर कोसळलं, संरक्षण मंत्र्यांसह ८ जणांचा मृत्यू
Plane Crash: अमेरिकेत आणखी एक दुर्घटना; समुद्रात कोसळले विमान

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com