Accident News saam tv
देश विदेश

Mexico Bus Accident : ४५ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसला मोठा अपघात; १७ जणांचा जागीच मृत्यू

सेंट्रल मेक्सिकोमधून बस अपघाताची मोठी दुर्घटना घडल्याची बातमी हाती आली आहे.

Vishal Gangurde

Mexico Bus Accident News : सेंट्रल मेक्सिकोमधून बस अपघाताची मोठी दुर्घटना घडल्याची बातमी हाती आली आहे. कोलंबिया आणि सेंट्रल अमेरिकेतून प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसला मोठा अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी दुपारी ही घटना घडली. वेगवेगळ्या देशातील ४५ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसला अपघात झाल्याने १७ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत. (Latest Marathi News )

मीडिया रिपोर्टनुसार, पुएब्ला येथील एका मंत्र्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, 'मेक्सिको बस (Bus) दुर्घटनेत १७ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य १५ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या जखमी प्रवाशांपैकी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर पाच जणांची प्रकृती नाजूक असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच त्यांनी मृतांच्या आकड्यात जखमींपैकी किती प्रवासी होते, यावर स्पष्टीकरण त्यांनी दिलं नाही.

मेक्सिकोच्या स्थानिक माध्यमांच्या रिपोर्टनुसार, चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्याने अपघात (Accident) झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघाताचे काही फोटोही समोर आले आहेत. त्याचबरोबर फोटोमध्ये काही जखमी प्रवासी देखील दिसत आहे. या अपघातातील प्रवाशांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या भीषण अपघाताने मेक्सिकोत शोककळा पसरली आहे.

दरम्यान, मागच्या आठवड्यात पनामा येथे झालेल्या अपघातात १२ हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या अपघातात त्यांचं वाहन दरीत कोसळलं होतं. हा अपघात मेक्सिकोमधील सर्वात दुर्दैवी अपघातात गणला गेला आहे. सासत्याने होणाऱ्या भीषण अपघातामुळे मेक्सिकन नागरिकांच्या चिंता वाढली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ketan Agarwal Case: लोहगडावर पोलिसांकडून सीन रिक्रिएशन, केतनला ढकललं त्याठिकाणी सियाला नेण्यात आलं; नेमकं काय घडलं?

Harshad Chopda: 'गर्लफ्रेंडने बेस्ट फ्रेंडसोबत मला चीट...'; प्रसिद्ध अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा

Maharashtra News Live Update: शेतकरी उपाशी आहेत, विकास करणाऱ्यांचा विमानाने प्रवास - उद्धव ठाकरे

पार्लरमध्ये जाण्याची गरज कशाला? 'या' ५ सोप्या स्टेप्सने घरीच करा फेशियल; चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो!

Pune : माय-लेकांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार; पुण्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना

SCROLL FOR NEXT