चंदीगड : ऑनलाईन लुडो खेळताना पाकिस्तानची मुलगी भारतीय मुलाच्या प्रेमात पडली. प्रेमाखातर पाकिस्तानातून ती मुलगी चक्क भारतातही आली. पण लपून छपून सुरु असलेलं हे प्रेमप्रकरण सेंट्रल एजन्सीच्या निशाण्यावर आलं. त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे.
इकरा जीवानी असं या 19 वर्षीय पाकिस्तानी मुलीचं नाव आहे. यूपीतल्या मुलायम सिंह यादव 25 वर्षीय तरुणासोबत ती ऑनलाईन लुडो खेळायची. खेळता खेळता इकराचा भारतीय मुलावर त्याच्यावरच जीव जडला. मग काय आपली ओळख लपवून भारतात आली आणि त्याच्यासोबत राहू लागली. मात्र आता बीएसएफने तिला पुन्हा पाकिस्तानात पाठवलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एक मुलगी आपल्यासाठी पाकिस्तानातून भारतात आली हे पाहून मुलानेही हिंमत दाखवत तिला जीवनसाथी बनवण्याचा निर्णय घेतला. दोघांनी लग्न केले आणि बंगळुरूमध्ये एकत्र राहू लागले. दरम्यान बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक करून भारतात प्रवेश करून येथे वास्तव्य केल्याप्रकरणी पोलिसांनी तरुणीला अटक केली होती.
पोलिसांच्या माहितीनुसार, मुलायम सिंह यादव हा मूळचे उत्तर प्रदेशचे आहेत. तो बंगळुरू येथील खासगी कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. मुलायम आपला बराच वेळ गेमिंग अॅप लुडो खेळण्यात घालवायचा. याच गेमच्या माध्यमातून तो पाकिस्तानातील हैदराबाद येथे राहणाऱ्या इकरा या तरुणीच्या संपर्कात आला. दोघेही प्रेमात पडले आणि त्यांनी एकमेकांशी लग्न करण्याचा विचार केला.
मुलायमच्या सांगण्यावरून तरुणीने सप्टेंबर 2022 मध्ये काठमांडू, नेपाळमार्गे भारतात प्रवेश केला. त्यानंतर दोघेही मुलगी आणि मुलायम दोघेही बंगळुरूच्या बेलंदूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लेबर क्वार्टरमध्ये राहू लागले. मात्र फार काळ ते एकत्र राहू शकले नाही. याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी कारवाई करत दोघांना अटक केली.
पोलिसांनी मुलीला परदेशी विभागीय नोंदणी कार्यालयाच्या ताब्यात दिले आहे. याप्रकरणी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे. बनावट पद्धतीने कागदपत्रे बनवून बनावट पद्धतीने शहरात राहिल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.आता रविवारी या तरुणीला पाकिस्तानला परत पाठवण्यात आले आहे. बीएसएफच्या जवानांनी इकराला अमृतसरच्या अटारी-वाघा सीमेवर पाक रेंजर्सच्या ताब्यात दिले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.