High Rent vs Low Salary Saam tv NEws
देश विदेश

३० हजार पगार, २० हजार भाडं; मोठी शहरं.. मध्यमवर्गीयांनी जगावं तरी कसं? विश्लेषकाची पोस्ट व्हायरल

High Rent vs Low Salary: विश्लेषकाच्या मतानुसार, भारतातील अनेक मुख्य शहरांमध्ये भाडे हे मासिक पगाराच्या निम्म्याहून अधिक खर्ची पडत आहे. यामुळे सामान्यांचे जगणे कठीण झालं आहे.

Bhagyashree Kamble

मोठ्या शहरांमध्ये राहण्याचे स्वप्न सामान्यांसाठी दिवसेंदिवस महाग होत चाललंय. मोठी शहरे सामान्यांचे उत्पन्न गिळत असल्याचा दावा एका विश्लेषकाने केला आहे. पगारातील मोठा हिस्सा घरभाड्यासाठी खर्च होत असल्याने महानगरांतील राहणीमान सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात असल्याचं एकंदरीत चित्र समोर आलं आहे.

सुजय यू यांनी लिंक्डइनवर यासंदर्भात पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी भारतातील मोठ्या शहरातील सरासरी उत्पन्न आणि भाड्यातील तफावत अधोरेखीत केली आहे. त्यांच्या मते, महिन्याला ३० हजार असणाऱ्या युवकांना त्यातील तब्बल २० हजार फक्त घरभाड्यासाठी खर्च करावे लागतात. म्हणजेच अनेक शहरांमध्ये उत्पन्नाच्या निम्म्याहून अधिक रक्कम थेट भाड्यात जाते.

सुजय यू यांनी पोस्टमध्ये आकडेवारी शेअर केली आहे. मु्ंबईत सरासरी एका व्यक्तीचे मासिक उत्पन्न सुमारे २५ हजार आहेत. एका छोट्या १ बीएचके घराचे भाडे १० ते १५ हजार रूपये आहे. बंगळूरूमध्ये सरासरी उत्पन्न जवळपास ३० हजार आहे. घराचे भाडे २० हजारपर्यंत आहे. दिल्ली, हैदराबाद आणि अहमदाबाद यांसारख्या शहरांमधील स्थिती किंचीत कमी ताणाची असली तरी, तेथील भाडे जवळपास उत्पन्नाच्या अर्ध्याहून अधिकच आहे.

सुजय यांनी पोस्टमध्ये म्हटलं की, 'मोठ्या शहरात ३० हजार पगार असला तरी, त्यातील अर्धी रक्कम थेट भाड्यात जमा होते. त्यावर किराणा, वीज अन् पाणी बिल,वाहतूक खर्च यांची भर पडली तर, जगणेच कठीण होते'. सुजय यांनी राहणीमानाच्या खर्चाबाबत म्हटलं की, 'अनेक रिअल इस्टेट गुंतवणूकदार घरे केवळ नफा मिळवण्याचे साधन म्हणून वापर करतात. भाडे दर वाढवण्यासाठी घरे रिकामी ठेवली जातात. लोकांचा पगार वाढलेला नाही. मात्र, खर्च वाढत चालला आहे', असं सुजय म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Traffic: मुंबईत तयार होतोय केबल- स्टे ब्रिज, मढ-वर्सोवा दीड तासांचा प्रवास होणार फक्त १० मिनिटांत

Municipal Corporations Election: महापालिकांवर कब्जा, त्याचा मंत्रालयावर झेंडा, 9 महापालिका ठरवणार राज्याचा 'किंगमेकर'

Uddhav- Raj Alliance: ठाकरेंच्या युतीचा मुहूर्त ठरला; भाजप-शिंदेसेनेला टक्कर देण्यासाठी ठाकरे बंधुंची रणनीती काय?

Fact Check : तुमचं व्हॉट्सअॅप हॅक होतंय? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? VIDEO

शिक्षक भरती घोटाळा: आणखी एका शिक्षणाधिकाऱ्याला अटक; 12 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT