PM Narendra Modi and Giorgia Meloni viral video  Saam TV News
देश विदेश

Modi-Meloni: PM मोदींसमोर मेलोनी यांनी सांगितली 'मन की बात'; नेमकं काय म्हणाल्या? वाचा सविस्तर

Italian PM Meloni Praises PM Modi: कॅनडामधील जी७ परिषदेत पंतप्रधान मोदी व इटलीच्या पीएम मेलोनी यांची भेट चर्चेत. मेलोनींचे मोदींवर कौतुक, अनौपचारिक संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल.

Bhagyashree Kamble

कॅनडामध्ये सुरू असलेल्या जी-७ समेटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध देशांच्या नेत्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचीही भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांनी एकमेकांचे स्वागत केले. यादरम्यान, मेलोनी यांनी पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं. दोघांमधील अनौपचारिक चर्चेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी कॅनडाच्या जी७ समेटला उपस्थित असल्याचं दिसून येत आहे. तसेच इटलीच्या पंतप्रधान मेलोनी देखील दिसून येत आहे. या भेटीत दोन्ही नेत्यांनी एकमेकांचे मनापासून स्वागत केले. तसेच हस्तांदोलन करून बोलण्यास सुरूवात केली. यावेळी मेलोनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना 'तुम्ही बेस्ट आहात, मी तुमच्यासारखी होण्याचा प्रयत्न करत आहे', असं म्हणत कौतुक केलं.

दोघांच्याही या भेटीची क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर नेटकरी कमेंट्स करून शेअर करत आहेत.

दरम्यान, पंतप्रधान मेलोनी यांनी नरेंद्र मोदी यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मेलोनी यांनी शेअर केलेला फोटो रिशेअर केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना मोदी म्हणाले, "भारत आणि इटलीमधील मैत्री अधिक घट्ट होईल आणि याचा दोन्ही देशांच्या नागरिकांना मोठा फायदा होईल."

मोदी आणि मेलोनी यांची मैत्री पहिल्यांदाच चर्चेत आली आहे, असे नाही. याआधीही त्यांचा फोटो व्हायरल झाला होता. दुबईतील COP28 समेट मध्ये दोन्ही पंतप्रधानांनी एकत्र सेल्फी क्लिक केला होता. मेलोनी यांनी हा सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला होता. 'Good Friends at COP28 #Melodi' असं कॅप्शन देत त्यांनी फोटो शेअर केला होता. काही क्षणात हा फोटो भारतात तुफान व्हायरल झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर प्रचंड वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबलचक रांगा | VIDEO

Serial TRP: 'ठरलं तर मग' की 'थोड तुझ थोड माझं'; टीआरपीच्या शर्यतीत कोणी मारली बाजी?

अंतराळात अन्न पचण्यासाठी किती तासांचा कालावधी लागतो?

Naigaon News : वसईमध्ये भयंकर घटना, १० हजार किलो काचेचा ढिग अंगावर कोसळला; २ कामगारांचा मृत्यू

Maharashtra Politics: शिक्कामोर्तब! ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार

SCROLL FOR NEXT