Meerut case Saam
देश विदेश

Meerut Crime: बरं झालं माझं लग्न झालं नाही, मेरठच्या सौरभ हत्याकांडावर धीरेंद्र शास्त्रींची मिश्किल टिप्पणी

Aniruddhacharya and Dhirendra Shastri Meerut Case: मेरठ हत्याकांडावर बागेश्वार धामचे बाबा पंडित धीरेंद्र शास्त्री आणि गौरी गोपाळ आश्रमचे कथावाचक अनिरूद्धाचार्य यांनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच मिश्किल टिप्पणीही केली आहे.

Bhagyashree Kamble

मुस्कान, सौरभ आणि साहिल. प्रेम, अनैतिक संबंध आणि यातून पतीची केलेली निर्घृण हत्या. मेरठ प्रकरणावरून राज्यातील वातावरूण ढवळून निघालं आहे. या घटनेच्या भयानकतेमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. मेरठ हत्याकांडावर बागेश्वार धामचे बाबा पंडित धीरेंद्र शास्त्री आणि गौरी गोपाळ आश्रमचे कथावाचक अनिरूद्धाचार्य यांनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच मिश्किल टिप्पणीही केली आहे. 'निळ्या ड्रममुळे पुरूषवर्ग दहशतीत आहेत. देवाची कृपा आहे की माझं लग्न झालेलं नाही', असं धीरेंद्र शास्त्री म्हणाले आहेत. तर, कथावाचक यांनी या प्रकरणावर फिरकी घेत टिप्पणी केली आहे.

'बरं झालं लग्न नाही झालं'

मेरठ हत्याकांडातील भयानकतेमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. श्री हनुमान कथन करण्यासाठी धीरेंद्र शास्त्री मेरठला गेले होते. यावेळी धीरेंद्र म्हणाले, 'मेरठ हत्याप्रकरण अत्यंत निंदनीय आहे. या घटनेसाठी पाश्चात संस्कृती जबाबदार आहे. अशा घटनांमुळे घटस्फोटाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. पालनपोषण आणि संस्कारात कमतरता असल्याचा हा परिणाम आहे'. असं शास्त्री म्हणाले.

'आयुष्यात एकदाच लग्न व्हायला हवं. संस्कारी कुटुंबासाठी रामचरितमानसचा आधार घ्यायला हवा. देवाची कृपा आहे की माझं लग्न झालेलं नाही. ज्या कुटुंबातील मुलं किंवा मुली असे कृत्य करतात, त्यांच्यावर संस्कार कमी झाले असावेत', असंही धीरेंद्र शास्त्री म्हणालेत.

..नाहीतर, डायरेक्ट ड्रममध्ये सापडाल

मेरठ हत्याकांडावर गौरी गोपाळ आश्रमचे अनिरूद्धाचार्य महाराज यांनीही भाष्य केलं आहे. 'आजकाल एक चांगला व्यवसाय सुरू झाला आहे. लग्न करा आणि घटस्फोटाचा अर्ज दाखल करा. जर मोठी पार्टी असेल, तर १-२ कोटी पोटगीमध्ये मिळेल. नाहीतर १०-२० लाख मिळतीलच. जास्त कमी पोटगी दिली तर, कदाचित निळ्या ड्रममध्ये सापडाल', असं मिश्किल टिप्पणी अनिरूद्धाचार्य महाराज यांनी मेरठ हत्याकांडावर केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025 Final: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडियाला धक्का; फायनलमध्ये सूर्यकुमार यादव खेळणार की नाही?

Maharashtra Live News Update: - धुळे येथील बंधाऱ्याच्या भिंतीची उंची अधिकाऱ्यांनी कमी केल्यामुळे याचा फटका शेतकरी व ग्रामस्थांना

नाचणाऱ्या कलेक्टरविरोधात वातावरण तापलं, शेतकरी-पोलीस आमने-सामने, VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी पाकिस्तानचा मोठा निर्णय, संपूर्ण स्पर्धेवर टाकला बहिष्कार

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बड्या नेत्यांसह ८०० कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

SCROLL FOR NEXT