Meerut Blue Drum Case: Saurabh Rajput Murder Case Court Verdict saam tv
देश विदेश

मेरठ 'ब्लू ड्रम' प्रकरणात न्यायालयाचा मोठा निकाल; मुस्कान आणि साहिल दोषी, कधी सुनावली जाणार शिक्षा?

Meerut Blue Drum Case: मेरठमधील एका स्थानिक न्यायालयाने 'ब्लू ड्रम' प्रकरणात महत्त्वपूर्ण निकाल दिलाय. सौरभ राजपूत याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाने आरोपी पत्नी मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला यांना दोषी ठरवले आहे.

Bharat Jadhav

  • मेरठमधील सौरभ राजपूत हत्या प्रकरणाला ‘ब्लू ड्रम केस’ म्हणून ओळखले जाते.

  • या प्रकरणात मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्ला आरोपी आहेत

  • प्रकरणात सुमारे 126 सुनावण्या आणि 22 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आले आहेत.

मेरठमधील चर्चित निळा ड्रम हत्या प्रकरणात न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिलाय. मेरठ न्यायालयाने या हत्या प्रकरणात मुस्कान आणि साहिल या आरोपींना दोषी ठरवले आहे. दरम्यान शिक्षा सुनावण्याची तारीख लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.

सुनावणीदरम्यान मुस्कान आणि साहिल हे दोन्ही आरोपी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. निकाल जाहीर करण्यापूर्वी न्यायाधीशांनी मुस्कानला विचारले,"आज निकालाचा दिवस आहे. मुस्कान, तुला काय वाटते? जे करणे आवश्यक होते, ते आम्ही केलंय.पुढे प्रश्न करताना न्यायाधीशांनी मुस्कानला म्हटलं की, आज शिक्षा सुनावली जाणार नाही, तुला काय वाटते? या गुन्ह्यामुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण झालंय. यावेळी न्यायालयाने मुस्कानलाच तिला कोणती शिक्षा योग्य वाटते ते तिनेह सुचवावे असं सागितलं.

१२६ सुनावण्या, २२ साक्षीदार आणि एक प्रदीर्घ खटला

सौरभ राजपूत हत्या प्रकरणातील आरोपी मुस्कान आणि साहिल यांच्या अटकेनंतर, न्यायालयात १२६ सुनावण्या झाल्या. एकूण २२ जणांनी साक्षीदार म्हणून साक्ष दिली आणि सुमारे १९ महिने चाललेल्या प्रदीर्घ खटल्यानंतर या दोघांनाही दोषी ठरवण्यात आले.

शिक्षा कधी सुनावली जाणार?

सौरभ राजपूतचे कुटुंब मुस्कान आणि साहिलला त्यांच्या कृत्यांची शिक्षा लवकरात लवकर मिळावी, या प्रतीक्षेत आहेत. न्यायालयाने शिक्षेची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. मात्र या दोन दोषींना फाशीची शिक्षाच व्हावी, अशी मागणी सौरभच्या कुटुंबीयांनी केली आहे. जर फाशीची शिक्षा सुनावली गेली नाही, तर न्यायासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा देण्याची त्यांची तयारी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Fort : शिखरावरचं रहस्यमय शिल्प! दुरून माणसासारखा दिसतो 'हा' किल्ला

ODI Ranking : कोहलीचा 'विराट' पराक्रम! वनडे रँकिंगमध्ये मोठी झेप, शुभमन गिलचं 'सिंहासन' धोक्यात

Maharashtra News Live Update: प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरण; पोलीस स्टेशन बाहेर छावणीचे स्वरूप, ठाकरे गटाचे कार्यकर्ते जमण्यास सुरूवात

Mosquitoes : डासांना पळवून लावण्यासाठी लिबांच्या सालीचा भन्नाट उपाय, एकदा नक्की करून पाहा

Housing Society : घरमालकांसाठी महत्त्वाचा नियम! फ्लॅट भाड्यानं देताना केली १ चूक, पुण्यात १३० जण अडचणीत; कायदा काय सांगतो? वाचा

SCROLL FOR NEXT