Maui wildfire Saam TV
देश विदेश

Maui wildfire: अमेरिकेच्या हवाईत अग्नितांडव! आतापर्यंत ६७ जणांचा होरपळून मृत्यू

वणव्यात शहरांतील तब्बल २७१ हून अधिक इमारतींचे नुकसाना झाले आहेत.

Ruchika Jadhav

Hawaii Wildfire: अमेरिकेत अग्नितांडव थांबता थांबत नाहीये. गेल्या काही दिवासांपासून हवाई बेटावरील माऊई येथे आग लागली आहे. अग्निशन दलाकडून आग शांत करण्याचे शर्थिचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र आतापर्यंत या आगीने ६७ जणांचा जीव घेतलाय. (Latest Marathi News)

हवाई येथे असलेल्या लहेना, पुलेहू आणि अपकंट्रीमध्ये आगीची भीषणता वाढत चालली आहे. गेल्य काही वर्षांमधील हा सर्वात जास्त भीषण वणवा मानला जात आहे. या वणव्यात शहरांतील तब्बल २७१ हून अधिक इमारतींचे नुकसाना झाले आहे. अनेक वाहने जळून खाक झालीत.

आगीपासून स्वत:ला वाचवण्यासाठी नागरिकांनी पाण्यात उड्या घेतल्या होत्या. त्यापैकी १४ जणांचा जीव वाचवण्यात यश आल्याचं तटरक्षक दलाने म्हटलं आहे. यातील जखमी व्यक्तींवर ओहू येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

चक्रीवादळ डोरामुळे हवाईमधील वणवा जास्त वाढत चालला आहे. असं अमेरिकेच्या हवामान विभागाने म्हटलंय. आगीची भीषणता फार जास्त असल्याने बचाव कार्यात अडथळा निर्माण होत आहे. भारतातून नेलेला १५० वर्षांचा वटवृक्ष देखील आगीच्या भक्षस्थानी आहे. बेटावर पसरलेल्या आगीमुळे नागरिक मृत्यूशी झूंज देत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT