Maternity leave Saam TV
देश विदेश

Maternity leave: आनंदाची बातमी! प्रसूती रजेबाबत मोठा निर्णय; सलग ९ महिन्यांची रजा मिळणार?

आता या सुट्टीचा कालावधी वाढवून ९ महिन्यांचा केला जाऊ शकतो.

Ruchika Jadhav

Maternity leave News: गरोदर महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लवकरच महिलांना मिळणाऱ्या प्रसूती रजेचा कालावधी वाढवला जाण्याची शक्यता आहे. आतापर्यंत प्रेग्नंसीमध्ये महिलांना ६ महिन्यांची सुट्टी दिली जात होती. आता या सुट्टीचा कालावधी वाढवून ९ महिन्यांचा केला जाऊ शकतो. यासाठीच्या हालचाली देखील सुरू झाल्या आहेत. (Latest Maternity leave)

नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्हीके पॉल यांनी या बाबत माहिती दिली आहे. गरोदर महिलांना त्या दिवसांमध्ये स्वत;ची आणि आपल्या बाळाची जास्त काळजी घ्यावी लागते. मात्र सुरुवातीचे ३ महिने महिलांना ऑफीसला येऊन काम करावे लागते. त्यानंतर त्यांना ६ महिन्यांची रजा मिळते. यात महिलांच्या आरोग्याचा विचार करत ६ महिन्यांची रजा वाढवून ती ९ महिने करण्यात यावी, असं मत डॉ. व्हीके पॉल यांनी व्यक्त केलं आहे.

मातृत्व लाभ विधेयक साल २०१७ मध्ये संसदेत मंजूर करण्यात आले. यात प्रसूती रजा २६ आठवड्यांची करण्यात आली होती. ही रजा या आधी फक्त १२ आठवड्यांची होती. पॉल यांनी म्हटलं आहे की, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांनी प्रसूती रजेत वाढ करण्यासाठी विचार केला पाहिजे असं म्हटलं आहे.

आजच्या घडीला अनेक महिला आपल्या पायावर उभ्या राहून कुटुंबाचा भार सांभाळत आहेत. यामध्ये खासगी तसेच सरकारी महिला कर्मचाऱ्यांना गरोगार असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. रोजच्या धावपळीच्या जीवनात रेल्वे प्रवास करावा लागतो. त्यामुळे या महिलांना संपूर्ण ९ महिने प्रसूती रजा मिळावी असा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navratri Outfit: यंदा नवरात्रीमध्ये करा नवीन स्टाईल, आरसे आणि कवड्यांनी डिझाइन केलेली बंजारा स्टाईल पॅन्ट

Sharad Pawar : शरद पवारांचा निर्धार, पुणे पालिका जिंकायचीच |पाहा VIDEO

Upvas Flour: नवरात्रीच्या उपवासासाठी बनवा 'हे' खास पीठ; डोसा, इडली सर्वकाही बनेल फक्त १० मिनिटांत

Constipation: बद्धकोष्ठतासाठी फक्त फायबर पुरेसे नाही, कारण काय? वाचा तज्ज्ञ काय सांगतात

Onion Price : कांद्याला तीन हजार रुपयांचा दर मिळावा; ग्रामसभेत एकमताने ठराव

SCROLL FOR NEXT