सोनभद्रच्या खाणीत उत्खननादरम्यान मोठा भाग कोसळल्याने दुर्घटना घडली आहे.
दोन जणांचा मृत्यू झाला आणि १५ जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.
ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफची पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत.
अंधारामुळे बचावकार्याला अडथळे येत असून गेल्या अनेक तासांपासून काम वेगाने सुरू आहे.
Sonbhadra mine collapse rescue operation latest updates : उत्तर प्रदेशमधील सोनभद्रमध्ये एका खाणीमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. खाणकाम करताना काही भाग कामगारांवर कोसळला अन् क्षणात होत्याचे नव्हते झाले. खाणीमध्ये कोसळलेल्या ढिगाऱ्याखाली १५ जण गाडल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्दैवी घटनेत दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटेनची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलीस, बचाव पथके आणि एसडीआरएफ, एनडीआरएफ पथके घटनास्थळी दाखल झाले आहेत. रात्रीची वेळ असल्यामुळे बचाव कार्यात अडथळा येत आहे. बचाव पथकाकडून वेगात मदतकार्य केले जात आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही या घटनेची दखल घेतली असून तात्काळ मदतकार्य करण्याच्या सूचना केल्या आहेत.
सोनभद्र जिल्ह्यात असणाऱ्या बिल्ली मारकुंडी खाण परिसरात आज सायंकाली काही भाग कोसळल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली आहे. बिल्ली मारकुंडी परिसरातील कृष्णा मायनिंग वर्क्स प्रो. दिलीप केसरी आणि मकसुदन सिंग यांच्या मालकीच्या खाणीत हा अपघात झाला आहे. ढिगाऱ्याखाली १० ते १५ जण अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आतापर्यंत ढिगाऱ्याखालून दोन कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या दुर्दैवी घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
स्थानिक माध्यमांच्या रिपोर्ट्सनसार, या खाणीत ७ ड्रिल मशीनद्वारे काम करत होत्या. प्रत्येक ड्रिल मशीनवर एकाच वेळी दोन ते ३ कामकार काम करत होते. त्याचवेळी ड्रिलिंग करत असताना काही भाग फुटल्यामुळे ही दुर्घटना झाली. ढिगाऱ्याखाली किती लोक गाडले आहेत हे अद्याप अधिकृत आकडा समोर आलेला नाही. पण अंदाजे १५ जण असू शकतात असा म्हटले जात आहे. दरम्यान, मागील पाच ते सहा तासांपासून बचावकार्य सुरू आहे. पण अंधारामुळे अडथळा तयार होत आहे.
या घटनेनंतर खाण मालक आणि त्याचे जोडीदार घटनास्थळावरून पळून गेले आहेत. पोलिसांकडून या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. खाण मालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून एक पथक रवाना करण्यात आलेले आहे. दुर्घटनेत मृत्यू पडलेल्या दोन जणांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी सरकारी रूग्णालयात पाठवण्यात आले आहे. दरम्यान, अपघाताचे कारण शोधून योग्य ती कारवाई केली जाईल असे जिल्हाधिकारी बद्रीनाथ सिंह यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.