bangladesh container depot Fire Saam Tv
देश विदेश

बांगलादेशमध्ये भीषण स्फोट; ४९ जणांचा मृत्यू, ३०० जण जखमी

मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. आतापर्यंत ३५ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

साम वृत्तसंथा

ढाका : बांगलादेशातील (Bangladesh) चितगाव येथे एका शिपिंग कंटेनर डेपोमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. रविवारी येथे भीषण आग लागली. या अपघातात आतापर्यंत ४९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. अग्निशमन दलाचे ५ जवानांचाही मृत्यू झाला आहे. या घटनेत ४५० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. आतापर्यंत ३५ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

ही घटना चितगाव येथील सीताकुंड उपजिल्ह्यातील कदमरसूल भागातील बीएम कंटेनर डेपोमध्ये घडली आहे. कंटेनर डेपोला शनिवारी रात्री नऊच्या सुमारास आग लागली. अग्निशमन दलाचे कर्मचारी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. या डेपोत रात्री ११.४५ च्या सुमारास मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे आग सर्वत्र पसरली. कंटेनरमधील केमिकलमुळे आग एका कंटेनरमधून दुसऱ्या कंटेनरमध्ये पसरली. स्फोट इतका मोठा होता की स्फोटोचा आवाज दूरपर्यंत झाला. यामुळे आजूबाजूची घरेही हादरली. अनेक घरांच्या खिडक्यांच्या काचाही तुटल्या आहेत.

' शनिवारी रात्री सीताकुंडा उपजिल्हातील कदमरसूल भागात असलेल्या बीएम कंटेनर डेपोला आग लागली. आग आणि त्यानंतर झालेल्या स्फोटात अनेकांचा मृत्यू झाला. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांसह अनेकांचा मृत्यू झाला. अपघातातील मृतांची संख्या ४९ वर पोहोचली आहे. ३०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती चटगावचे आरोग्य आणि सेवा विभागाचे प्रमुख इस्तकुल इस्लाम यांनी दिली.

या आगीचे कारण अजुनही समोर आलेले नाही, परंतु कंटेनरमधून आग लागल्याचे दिसत आहे. ही आग आटोक्यात आणण्यासाठी १९ हून अधिक अग्निशमन दलाच्या गाड्या आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss : धावणे की सायकल चालवणे; वजन झटपट कमी करण्यासाठी काय फायदेशीर? १५ दिवसांत फरक दिसेल

Maharashtra News Live Update: गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयातील उपाहारगृह आणि बोरिवलीतील राधाकृष्ण हॉटेलचा परवाना निलंबित

Maharashtra Lake : आकाशाचं प्रतिबिंब अन् हिरवागार साज, महाराष्ट्रातील 'या' तलावाचं सौंदर्य आहे पाहण्यासारखं

Acidity : सकाळचा चहा विसरा! दिवसाची सुरुवात करा 'या' पेयाने, ॲसिडिटी-जळजळ झटक्यात होईल गायब

गृहमंत्री अमित शाहांच्या रॅलीत भाजप नेत्याचा मृत्यू; राजकीय वर्तुळात शोककळा

SCROLL FOR NEXT