Fire in Garib Rath Express AC Coaches Near Sirhind Station : अमृतसर-सहरसा या मार्गावर धावणाऱ्या गरीब रथ एक्सप्रेस ट्रेनमध्ये आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सरहिंद रेल्वे स्टेशनजवळ ट्रेनच्या तीन एसी बोगीमध्ये अचानक आग लागली. या दुर्घटनेनंतर रेल्वे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. काही प्रवासी सैरवैर धावू लागले. या दुर्घटनेत एक महिला गंभीर भाजली गेल्याचे वृत्त समोर आले आहे. ट्रेनमध्ये आग लागल्याची घटना समोर येतोच रेल्वेकडून तात्काळ मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. Garib Rath Express train fire latest update
बिहारकडे जाणारी ट्रेन क्रमांक 12204 अमृतसर-सहरसा गरीब रथला आज सकाळी अचानक आग लागली. आग लागल्यानंतर ट्रेनमध्ये एकच हाहाकार माजला. लोक सैरवैर धावू लागले. या दुर्घटनेत एक महिला गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर स्थानिक रूग्णालयात उपचार करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सरहिंद रेलवे स्टेशनजवळ धावत्या रेल्वेच्या तीन एसी बोगीमध्ये अचानक आग भडकली. ट्रेन तात्काळ सरहिंद रेलवे स्टेशनवर थांबवण्यात आली अन् कुलिंगचे काम करण्यात आले. जखमी महिलेला तात्काळ रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. महिलेची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे. (Amritsar–Saharsa Garib Rath Express Fire Three Coaches Damaged No Major Casualties Reported latest marathi news)
मिळालेल्या माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे एसी बोगीला आग लागली होती. ही आग त्यानंतर तीन बोगीपर्यंत पसरली गेली. आग लागल्याचं समजताच प्रवाशांमध्ये हाहाकार उडाला. आगीची माहिती रेल्वेला मिळताच मदतकार्य तात्काळ सुरू कऱण्यात आले.
अग्निशमन विभागाने तात्काळ धाव घेत आगीवर नियंत्रण मिळावले असून सध्या कुलिंगचे काम करण्यात येत आहे. गरीब रथ एक्सप्रेसमधील एसी बोगी (G19, 223125/C) आगीमध्ये प्रभावित झाली आहे. त्याशिवाय अन् दोन डब्ब्याचेही नुकसान झाले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. बोगीमधून सामान बाहेर काढताना एक महिला दुखापतग्रस्त जाली. त्या महिलेवर सध्या उपचार सुरू आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.