Fire News Saam TV
देश विदेश

Secunderabad Fire News : सिकंदराबादमध्ये मोठी दुर्घटना; इमारतीला भीषण आग, ४ महिलांसह ६ जणांचा मृत्यू

धूर जास्त झाल्याने श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

साम टिव्ही ब्युरो

Hyderabad News: हैदराबादमधील सिकंदराबाद येथे गुरुवारी रात्री आगीची मोठी दुर्घटना घडली आहे. येथे लागलेल्या आगीत होरपळून ४ महिलांचा मृत्यू झालाय. तसेच अन्य २ व्यक्तींचा देखील यात मृत्यू झाला आहे. इमारतीला लागलेली आग इतकी भीषण होती की, धुराचे लोट हवेत दूरवर पसरले होते. (Secunderabad)

मिळालेल्या माहितीनुसार, सिकंदराबादच्या स्वप्नलेक या कॉम्प्लेक्समध्ये काल रात्री आठच्या सुमारास आग लागली. शॉकसर्कीट झाल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. या घटनेत एका व्यक्तीला धूर जास्त झाल्याने श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत आतापर्यंत ६ व्यक्तींचे मृतदेह मिळाले आहेत. यामध्ये चार महिलांचा आगीमध्ये होरपळून मृत्यू झाला आहे. तसेच जखमी व्यक्तींना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील एका व्यक्तीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाची वाहने दाखल झाली होती. मात्र आग जास्त पसरल्याने त्यावर नियंत्रण मिळण्यात बराच वेळ गेला. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्यानंतर जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: बारामतीमध्ये अजित पवारांच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष करायला सुरुवात

Healthy Breakfast: नाश्त्यासाठी बनवा कमी साहित्याचा 'हा' पौष्टीक पदार्थ

Chopda Vidhan Sabha : निवडणुकीचे काम टाळणाऱ्या २१ कर्मचाऱ्यांवर गुन्हा; विनापरवानगी राहिले गैरहजर

Assembly Election Results 2024 : राज्यात कोणाचं सरकार येणार? सुरुवातीच्या कलात महायुती आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: बहुमताचा आकडा गाठला, सुरुवातीचा कल महायुतीकडे, भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत!

SCROLL FOR NEXT