Firefighters rescue patients after a blaze broke out at Anandalok Hospital in Kolkata’s Salt Lake area. saam tv
देश विदेश

प्रसिद्ध आनंदलोक रुग्णालयात अग्नितांडव; जिकडे तिकडे धुराचे लोट, खिडक्या तोडून रुग्णांनी वाचवला जीव

Fire Breaks Out At Anandalok Hospital In Kolkata Salt Lake: कोलकात्यातील आनंदलोक रुग्णालयात भीषण आग लागल्याने खळबळ उडाली. सुमारे ७५ ते ८० रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Omkar Sonawane

पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्ता येथील आनंदलोक रुग्णालयात भीषण आग लागली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून उपचार घेत असलेल्या रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे. घटनेच्या वेळी रुग्णालयात किती रुग्ण दाखल होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 10 वाजेच्या सुमारास या घटनेबद्दल अग्निशमन दलाला फोन आला. त्यानंतर आग विझवण्यासाठी घटनास्थळी तीन अग्निशमन दलाच्या गाड्या पाठण्यात आल्या. अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले की, सॉल्ट लेकमधील करुणमयी क्रॉसिंग येथील एका खाजगी हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावर आग लागली होती. यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसून कोणीही जखमी झाले नाहीये.

आग लागल्यानंतर लगेचच रुग्णांना स्ट्रेचर आणि व्हीलचेअरच्या साहाय्याने हलवण्यात आले. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, अंदाजे ७५ ते ८० रुग्णांना रुग्णालयातून बाहेर काढून दुसऱ्या इमारतीत हलवण्यात आले आहे. दिलासादायक बाब म्हणजे रुग्णालयातील सर्वजण सुरक्षित आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

घटनेचे कारण अद्याप अज्ञात आहे. सूत्रांच्या हवाल्याने 'द टेलिग्राफ'ने दिलेल्या वृत्तानुसार, रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या कॅथ लॅबमधून धूर निघताना दिसला. एअर कंडिशनरमधील शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा अग्निशमन दलाला संशय आहे. मात्र, अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salt water: सकाळी उठल्यावर प्या एक ग्लास मीठाचं पाणी; मिळतील 4 जबरदस्त फायदे

Maharashtra News Live Update :दिल्लीत संसद मार्गाची सुरक्षा वाढवली

Gold Rate Today : ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सराफा बाजारात १ तोळे सोन्याची किंमत इतकी; वाचा 24k, 22k, 18k चे ताजे दर

Nana Patekar death: नाना पाटेकरांचं कार्डियाक अरेस्टने निधन; ही 5 लक्षणं वेळीच जाणून घ्या

Nana Patekar Death : पहाटे ४ वाजता बेशुद्ध अवस्थेत सापडले नाना पाटेकर! शेवटच्या काही तासांत नक्की काय घडलं? डॉक्टरांचा धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT