Ajmer Hotel Fire Saam Tv
देश विदेश

Ajmer Hotel Fire: अजमेरमध्ये अग्नितांडव! ५ मजली हॉटेलला भीषण आग, चिमुकल्यासह ४ जणांचा होरपळून मृत्यू

Rajasthan Hotel Fire: राजस्थानच्या अजमेरमध्ये हॉटेलला सकाळी भीषण आग लागली. या आगमध्ये होरपळून ४ जणांचा मृत्यू तर चौघे गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये चिमुकल्याचा देखील समावेश आहे. आगी अद्याप नियंत्रण मिळवण्यात यश आले नाही.

Priya More

Fire Accident: राजस्थानच्या अजमेर शहरामध्ये भीषण आगीची घटना घडली. ५ मजली हॉटेलला लागलेल्या भीषण आगीमध्ये ४ जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर ४ जण गंभीररित्या जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अजमेरच्या डिग्गी बाजारमध्ये असलेल्या हॉटेल नाजला आज सकाळी आग लागली. या हॉटेलमध्ये अनेक जण मुक्कामासाठी थांबले होते. हॉटेलला आग लागताच एकच गोंधळ उडाला. सर्वजण इकडे तिकडे पळू लागले. बाहेर पडायला रस्ता नाही, ना लपायला जागा नाही अशी स्थिती हॉटेलमध्ये अडकल्याची झाली. त्यामुळे हॉटेलमध्ये असणाऱ्या एका चिमुकल्यासह चार जणांचा आगीमध्ये होरपळून मृत्यू झाला. तर ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी व्यक्ती ५० ते ९० टक्के भाजले आहेत.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. अरुंद रस्ते असल्यामुळे घटनास्थळी पोहचण्यास अग्निशमन दलाला अनेक अडचणी आल्या. पोलिस प्रशासन आणि अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरू आहे. या आगीमध्ये जखमी झालेल्यांना उपचारासाठी जेएलएन रुग्णालयात दाखल करण्यात आले. सकाळी ही घटना घडल्यामुळे हॉटेलमध्ये असणारे सर्वजण गाढ झोपेत होते. ही आग नेमकी कशामुळे लागली यामागचे कारण समोर आले नाही.

आग लागल्यानंतर अवघ्या ३० मिनिटांमध्ये आगीने संपूर्ण हॉटेलला वेढलं. या हॉटेलमध्ये अजूनही काही जण अडकल्याची शक्यता आहे. हॉटेलमध्ये अजून किती जण अकडले आहेत यांचा आकडा समोर आला नाही. आग लागल्यानंतर हॉटेलमध्ये सगळीकडे धूर झाला त्यामुळे अनेक जण गुदमरून तिथेच पडले. तर काहींनी कसं तरी हॉटेलच्या बाहेर पळ काढत आपला जीव वाचवला. आगीने रौद्ररूप धारण केले आहे त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवणं देखील कठीण झाले आहे. हे हॉटेल अवैधरित्या चालवले जात असल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Washim Accident: वाशिममध्ये भीषण अपघात! १३ चिमुकल्यांना घेऊन जाणारी व्हॅन खड्ड्यात पलटली अन् पुढे...

katrina kaif: कतरिना कैफपूर्वी ‘या’ अभिनेत्रींनी चाळीशीत घेतलेला आई होण्याचा निर्णय

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये आदिवासींची महापंचायत

Virat Kohli: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सीरीज खेळण्यास किंग कोहलीचा नकार, वनडे क्रिकेटमधून विराट घेणार निवृत्ती?

Breaking : मोठी बातमी! लडाख हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू; अखेर सोनम वांगचुक यांना अटक, इंटरनेट सेवाही बंद

SCROLL FOR NEXT