Massive Explosion at delhi Saam tv
देश विदेश

मोठी बातमी! दिल्लीतील लाल किल्ल्याच्या परिसरात मोठा स्फोट

Massive Explosion at delhi : दिल्लीतील लाल किल्ल्याच्या परिसरात मोठा स्फोट झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ

Vishal Gangurde

दिल्ली लाल किल्ला मेट्रो स्टेशन परिसरात कार स्फोट

स्फोटामुळे अनेक लोक जखमी

स्फोटानंतर झालेल्या भीषण आगीत २-३ गाड्या जळून खाक

पोलिस आणि आपत्कालीन सेवा घटनास्थळी दाखल

दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ कारमध्ये मोठा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटानंतर लोकांची एकच धावाधाव झाली. या घटनेत अनेक लोक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. मेट्रो स्टेशनपरिसरात ६.४५ वाजता ही स्फोटाची घटना घडली. लाल किल्ल्याजवळील स्फोटामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

स्फोटानंतर कारला भीषण आग लागली. या आगीत दोन-तीन गाड्या जळून खाक झाल्या आहेत. या आगीचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ वर ही घटना घडली आहे. या स्फोटानंतर आजूबाजूला उभ्या असलेल्या कारच्या काचा देखील फुटल्या आहेत. स्फोट झाला, त्यावेळी घटनास्थळी मोठी गर्दी होती. या स्फोटानंतर काही जण जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तर या स्फोटात एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

लाल किल्ल्याजवळ कारमध्ये स्फोट हा सीएनजीमुळे झाला की इतर कशामुळे झाला, याचा शोध अद्याप लागलेला नाही. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या ७ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरु आहे.

लाल किल्ल्याजवळील झालेल्या स्फोटामुळे सुरक्षा एजन्सीची झोप उडाली आहे. दिल्लीजवळील फरीदाबादमध्ये आज २९०० किलो अमेनियम नायट्रेट आढळलं. त्यामुळे घातपाताचा संशय देखील व्यक्त करण्यात येत आहे. मात्र याबाबत कोणाकडूनही अधिकृत भाष्य करण्यात आलेलं नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Formal Pants For Woman: महिलांसाठी फॉर्मल पॅन्टचे 5 लेटेस्ट डिझाईन्स; ऑफिस लूकसाठी बेस्ट

Actress Death: भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, वृद्धाश्रमात घेतला अखेरचा श्वास

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आक्रमक; हेक्टरी 1 लाख, शेतमजुरांना 25 हजारांची मदतीची मागणी

Bike Mileage: बाईकला किती स्पीडमध्ये चालवली तर चांगलं मायलेज मिळतं? जाणून घ्या योग्य स्पीड

Rajya Sabha Election: मोठी बातमी! राज्यसभेसाठी भाजपकडून ८ उमेदवारांच्या नावाची घोषणा, कुणाला दिली संधी?

SCROLL FOR NEXT