Lucknow LPG Cylinder Blast Saam TV
देश विदेश

Cylinder Explosion: घरगुती गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट; लग्नाच्या वाढदिवशीच पती-पत्नीसह ५ जणांचा मृत्यू

LPG Cylinder Blast: एलपीजी गॅस सिलिंडरच्या स्फोटात पती-पत्नीसह ५ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना लखनऊमधील काकोरी भागात मंगळवारी (ता. ५) मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

Satish Daud

Lucknow LPG Cylinder Blast

एलपीजी गॅस सिलिंडरच्या स्फोटात पती-पत्नीसह ५ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना लखनऊमधील काकोरी भागात मंगळवारी (ता. ५) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत ४ जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सिलिंडरचा स्फोट इतका भीषण होता, की संपूर्ण परिसर हादरवून गेला. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुशीर अली (वय ५०) हुस्ना बानो (वय ४५) रैया (वय ५) हुमा (वय ३) आणि हिबा (वय २) अशी स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची नावे आहेत. या घटनेनं परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लखनऊमधील काकोरी भागात मुशीर अली आपल्या कुटुंबासहित राहत होते. (Latest Marathi News)

मंगळवारी मुशीर आणि हुस्ना बानो यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी काही नातेवाईक त्यांच्या घरी आले होते. रात्रीच्या जेवणानंतर सर्वजण झोपी गेले. त्यावेळी घरात अचानक आग लागली. बघता-बघता आगीचा भडका उडाला.

आग किचनपर्यंत गेल्यानंतर काही क्षणात सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता, की संपूर्ण घर कोसळले. या भीषण दुर्घटनेत मुशीर यांच्यासह हुस्ना बानो आणि त्यांच्या नातेवाईकांच्या तीन चिमुकल्या मुलींचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य ४ जण गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. नेमकी आग कशामुळे लागली, याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. या घटनेनं परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RBI Rule: फोन, टीव्ही, फ्रिज EMI वर घेताय? RBI च्या निर्णयामुळे बसणार फटका; वाचा सविस्तर

Ladaki Bhain Yojna : लाडक्या बहिणींना यंदा सरकारकडून भाऊबीज भेट नाही? कारण आलं समोर | VIDEO

Crime News: 19 वर्षाचा पुतण्या मावशीच्या प्रेमात झाला वेडापिसा, असं काय केलं की सगळे थक्क झाले

Maharashtra Live News Update: कोल्हापूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन

Heart Attack: बिछान्यावर झोपल्यावर खोकला, पाय सुजतायेत? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

SCROLL FOR NEXT