इराणच्या बंदर अब्बास शहरात भीषण स्फोट झालाय.
आठ मजली निवासी इमारत पूर्णपणे कोसळली, वाहनांचेही नुकसान झाले आहे.
स्फोटाचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट
अमेरिकेसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणमधून मोठी बातमी हाती आलीय. इराणच्या दक्षिणेकडील बंदर शहर बंदर अब्बासमध्ये एका शक्तिशाली स्फोट झालाय. या स्फोटात ८ मजली इमारतीत हा स्फोट झाला आहे. या स्फोटामुळे अनेक वाहने नुकसानग्रस्त झाली आहेत. दरम्यान हा स्फोट कशामुळे झाला याची माहिती अद्याप मिळाली नाहीये.
इराणचे दक्षिणेकडील बंदर शहर बंदर अब्बास स्फोटांनी हादरले आहे. इराणी सरकारी माध्यमांनुसार, हा स्फोट एका बहुमजली इमारतीत झाला. स्फोटाचे कारण त्वरित स्पष्ट झालेले नाही. आयआरजीसी गेस्टहाऊस लक्ष्य होते. इराणच्या अमेरिकन लष्कराच्या हालचाली वाढलेल्या असताना हा स्फोट झाला आहे. त्यामुळे आता इराणी सरकारची चिंता वाढलीय. दुसरीकडे इस्रायलने त्यांनी हल्ला केला नसल्याचं म्हटलंय.
इराणच्या सरकारी टेलिव्हिजन चॅनेलने दिलेल्या माहितीनुसार बंदर अब्बासमधील मोआलेम बुलेव्हार्डवर असलेल्या आठ मजली इमारतीत हा स्फोट झाला. या स्फोटात इमारतीचे दोन मजले पूर्णपणे उद्ध्वस्त झालेत. तसेच अनेक वाहनांचे नुकसान झाले आणि जवळच्या दुकानांचेही नुकसान झाले. स्थानिकांच्या मते, स्फोटाचा आवाज दूरवर ऐकू आला, ज्यामुळे परिसरात घबराट पसरली आहे. बंदर अब्बास शहरातील या स्फोटानंतर मदत आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झालेत.
अग्निशमन दल आणि आपत्कालीन सेवांनी ढिगाऱ्यात अडकलेल्या लोकांचा शोध सुरू केलाय. स्फोटानंतर या ठिकाणी आग लागली होती, या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. इराणी रिव्होल्यूशनरी गार्डच्या नौदल कमांडरला या स्फोटात लक्ष्य करण्यात आल्याचे म्हटलं जातंय. या हल्ल्यानंतर इराणी लष्करप्रमुख अमीर हतामी विधान जारी केले आहे. इराणी सैन्य पूर्णपणे सतर्क आहे. कोणत्याही संभाव्य हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज आहे, असं हतामी यांनी म्हटले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.