Earthquake  Saam Tv News
देश विदेश

Earthquake : इमारती कोसळल्या, लाईट गेली; जीव वाचवण्यासाठी लोकांची पळापळ; भूकंपामुळे ६.१ रिश्टर स्केलचे हादरे

Turkey earthquake 6.1 magnitude latest update : तुर्कीएमध्ये ६.१ रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप झाला. इमारती कोसळल्या, वीज गायब झाली आणि नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी रस्त्यावर पळ काढला. परिसरात भीतीचं वातावरण आहे.

Namdeo Kumbhar

Turkey Earthquake : शक्तिशाली भूकंपामुळे क्षणात होत्याचं नव्हतं होतं. आतापर्यंत लाखो लोकांचा मृत्यू झाला. भूकंपाने सोमवारी तुर्कीएमध्ये हाहाकार माजवला. मिडिया रिपोर्ट्सनुसार, सोमवारी रात्री पश्चिम तुर्कीएमध्ये ६.१ तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपाचे हादरे बसले. भूकंपामुळे इमारती कोसळल्या. त्या परिसरातील बत्ती गूल झाली होती. जीव वाचवण्यासाठी नागरिकांनी इमारतीबाहेर पळ काढला. रस्त्यावर एकच गोंधळ पाहायला मिळाला. या घटनेचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

तुर्कीएमध्ये झालेल्या भूकंपामुळे तीन इमारती कोसळल्या.सुदैवाने या भूकंपामध्ये अद्याप कोणत्याही जीवितहानीचे वृत्त नाही. काहीजणांना किरकोळ दुखापत झाल्याचे समजतेय. भूकंपाचे हादरे जाणवण्यसा सुरूवात होताच नागरिकांनी घराबाहेर पळ काढला होता. भूकपांच्या वेळचे घरातील व्हिडिओ काही जणांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. त्यामध्ये भूकंपाची तीव्रता दिसतेय.

एएफएडीने दिलेल्या माहितीनुसार, बालिकेसिर प्रांतातील सिंडिरगी शहर हे भूकंपाचे केंद्र होते. स्थानिक वेळेनुसार (१९४८ GMT) २२:४८ वाजता ५.९९ किलोमीटर (३.७२ मैल) खोलीवर भूकंपाचे हादरे जाणवले. बुर्सा, मनिसा , इझमीर आणि इस्तंबूल प्रांतांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपामुळे अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही, परंतु खबरदारी घेतली जात आहे.

भूकंपाचे हादरे जाणवल्यानंतर अनेक रहिवाशांनी रात्र घराबाहेर जागून काढली. कारण भूकंपाचे आणखी धक्के जाणवतील, अशी भीती त्यांच्या मनात होती. या संकटात पावसाने भर टाकली. जोरात पाऊस सुरू झाला अन् बत्तीही गूल झाली. स्थानिक अधिकाऱ्यांनी घरी परत न जाणाऱ्यांना आश्रय देण्यासाठी मशिदी, शाळा आणि क्रीडा हॉल उघडले, असे हॅबरटर्क टेलिव्हिजनने वृत्त दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुमचं WhatsAPP कुणीतरी वाचतंय? लीक झालेल्या डेटात तुमचाही नंबर? VIDEO

Maharashtra Politics : 'उदय सामंत शिंदेसेना फोडणार'; ठाकरे गटाच्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

Friday Horoscope : वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता; ५ राशींच्या लोकांना अडचणीवर मात करावी लागणार

Uddhav Thackeray : साधू हत्याकांडातील आरोपीला भाजपमध्ये प्रवेश म्हणजे हिंदुत्वाचा अपमान? उद्धव ठाकरे कडाडले

कोकणात राणे बंधू आमने-सामने, भावांच्या संघर्षाला नारायण राणेंचा आशीर्वाद?

SCROLL FOR NEXT