Masood family killed Operation Sindoor 14 members  Saam Tv News
देश विदेश

'Operation Sindoor'मध्ये मसूदच्या कुटुंबाचा खात्मा, अजहरच्या कुटुंबातील १४ जणांचा जागीच अंत

Operation Sindoor : भारताच्या ऑपरेशन सिंदूरनं पाकमधील दहशतवादी तळ उध्वस्त केलेत....एवढंच नाही तर या हल्ल्यात मसूद अजहरचं सर्वात मोठं नुकसान झालंय. या हल्ल्यात मसुद अजहरच्या कुटुंबातील किती जणांचा खात्मा करण्यात आलाय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये.

Prashant Patil

सुप्रीम मस्कर, साम टिव्ही

नवी दिल्ली : भारताचा सगळ्यात मोठा शत्रू दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबाचा 'ऑपरेशन सिंदूर'द्वारे खात्मा करण्यात आलाय. जैश-ए- मोहम्मदचा प्रमुख असणाऱ्या दहशतवादी मसूद अजहरच्या घरावर भारतीय वायूसेनेने हल्ला केलाय. इथे जैश-ए-मोहम्मदचं मुख्यालय देखील होतं. याच मुख्यालयात त्याचं प्रशिक्षण केंद्र होतं आणि इथूनच तो आपल्या संघटनेसाठी फंडींगच काम करायचा..तेच बेचिराख झाल्यानं मसूद अजहरला जोरदार धक्का बसलाय. त्यातच ऑपरेशन सिंदूरमध्ये मसूदच्या कुटुंबींयांचा खात्मा झाल्यानं आता तो एकाकी पडलाय.

'ऑपरेशन सिंदूर' मसूदच्या कुटुंबाचा खात्मा

मसूद अजहरच्या कुटुंबातील 14 जणांचा खात्मा

मसूद अजहरची बहीण, मौलाना कशफचं पूर्ण कुटुंब ठार

राऊफ असगरचा मुलगा हुजैफा, भावाच्या पत्नीचा खात्मा

मुफ्ती अब्दुल राऊफचा नातू, मुलगी शहीद बाजी सादियाच्या पतीसह 4 मुलं ठार

मसूद अजहरचा भाऊ दहशतवादी राऊफ असगर गंभीर जखमी

राऊफ असगर कंदाहार विमान अपहरण प्रकरणातील मास्टरमाईंड

पहलगाम हल्ल्याच्या कटात दहशतवादी राऊफ असगरचा सहभाग

भारतविरोधात दहशतवादी कारवायांमध्ये मसूद अजहरचा नेहमीच हात राहिलाय. मसूद अजहरचं नाव पहिल्यांदा २६\११ हल्ल्यात समोर आलं होतं. त्य़ानंतर मसूदच्या भारतविरोधी कारवायात वाढता सहभाग भारताची चिंता वाढवत होता.

कोण आहे मसूद अजहर?

जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेचा म्होरक्या

जैश-ए-मोहम्मदकडून भारतात अनेक हल्ले

जम्मू-काश्मीर विधानसभा, भारतीय संसदेवर हल्ला

१९९९ साली कंदहार विमानतळावर भारतीय विमानाचं अपहरण

१५५ प्रवाशांच्या सुटकेच्या बदल्यात अजहरची सुटका

ऑपरेशन सिंदूरमध्ये मसूद अजहरच्या कुटुंबियांचा खात्मा झाल्यानं तो एकाकी पडलाय. हल्ल्यात मी का मेलो नाही, असा प्रश्नचं हतबल झालेल्या मसूदने विचारलाय. मसूदने आयुष्यभर ज्या दहशतवादी संघटनेसाठी फंडिग जमा केलं ते एका क्षणात उद्धवस्त झालयं. प्रशिक्षण दिलेले मसूदचे दहशतवादी साथीदारही भारताच्या हल्ल्यात ठार झालेत. इतकचं काय तर मसूदने आपल्या जिवलगांनाही गमावलयं. त्यामुळे इथून पुढे भारताविरोधात दहशतवादी हल्ला घडवताना मसूदला हजारदा विचार करावा लागेल हे निश्चित

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT